आम्हीं तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेंल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाहीं ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे शहाणपण आहे. (1 करिंथ 1:23-24)
आम्हांवर आमच्या सृष्टीकर्त्याची दंडाज्ञा आहे आणि त्याच्या गौरवाचे मूल्य जपण्यासाठीं त्यानें आमच्या पापावर सार्वकालिक क्रोध ओतून आपला नाश करावा म्हणून तो स्वतःच्या नीतिमान चारित्र्यामुळें बाध्य आहे या अरिष्टकारक वर्तमानाला घातक असे सुवार्तेचे एक अद्भुत वर्तमान आहे.
हे असे सत्य आहे जे कोणीहि निसर्गाकडून शिकू शकत नाहीं. सुवार्तेचे हे सत्य शेजाऱ्यांना कळवणें आवश्यक आहे आणि मंडळीमध्यें त्याची घोषणा केलीं गेली पाहिजे आणि सुवार्तीक हेच सत्य घेऊन जगांत गेलें पाहिजे.
उत्तम बातमी अशी कीं आपण संपूर्ण मानवजातीला दंडाज्ञा देऊ नये पण तरीही आपल्या न्यायीपणाच्या सर्व अटी पूर्ण व्हाव्यांत अशी व्यवस्था देवानें स्वतः केलीं आहे.
पापी लोकांचा हिशेब चुकता करण्याचा आणि आपले न्यायीपण कायमस्वरूपी जपण्याचा एक मार्ग म्हणजें नरक. पण आणखी एक मार्ग आहे. आणि देवानें त्या दुसऱ्या मार्गाचे प्रयोजन केलें. हेच ते शुभवृत्त.
देवाचे शहाणपण हे कीं देवानें देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्हीं देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतिचा मार्ग देवानें स्वतः नियोजित केला आहे. हा तो मार्ग : शुभवर्तमान. मी ते पुन्हा सावकाशपणें सांगतो : देवाचा सुज्ञपणा हा कीं देवानें देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्हीं देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतिचा मार्ग देवानें स्वतः नियोजित केला आहे.
आणि हे शहाणपण काय आहे? पापी लोकांसाठीं देवाच्या पुत्राचे मरणें! “आम्हीं तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. . . देवाचे सामर्थ्य व देवाचे शहाणपण” (1 करिंथ 1:23-24).
ख्रिस्ताचे मरण हे देवाचे शहाणपण आहे ज्याद्वारे देवाची प्रीति पापी लोकांना देवाच्या क्रोधापासून वाचवते, आणि त्याचवेळी ख्रिस्तामध्यें देवाचे नीतिमत्वहि टिकवून ठेवते आणि उघडपणें प्रदर्शित करते.