आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा कीं मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजें ते माझ्यापासून माघार घेणार नाहींत. मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.” (यिर्मया 32:40-41)
आपल्याकडून देवाचे गुणगान व्हावें हा त्याचा शोध आणि त्याच्यामध्यें आपल्या सर्व आनंदाचा शोध, हे दोन्हीं उद्यमांचा शेवट एकच आहेत. त्याचा गौरव व्हावा म्हणून देवाची मोहीम आणि आपण केवळ त्याच्यामध्यें संतुष्ट राहावे ही आमची मोहीम ह्या दोन्हीं गोष्टींचा कळस यांत आहे : देवामध्यें आमचा आनंद, जो स्तुतीने भरून वाहतो.
देवाच्या बाजूने, स्तुती ही त्याच्या लोकांच्या अंतःकरणात त्याच्या स्वतःच्या वैभवाची गोड प्रतिध्वनी आहे.
आमच्या बाजूने, स्तुती ही त्या संतुष्टीचा शिखर आहे जी देवाच्या सहवासात राहण्याने प्राप्त होते.
या शोधाचा मती गुंग करणारा निहीतार्थ हा आहे कीं देवाची ती सर्वसमर्थ शक्ती जी देवाच्या अंत:करणाला त्याचा स्वतःच्या गौरवाचा शोध घेण्यांस चालना देते तीच सर्वसमर्थ शक्ती जे त्याच्यामध्यें आपला आनंद शोधतात त्यांच्या अंतःकरणाला आपण संतुष्ट करावे म्हणून देखील त्याला चालना देते.
बायबलचे शुभवर्तमान हेच कीं देव त्याच्यावर आशा ठेवणाऱ्यांची अंतःकरणें संतुष्ट करण्यापासून कदापि माघार घेत नाहीं. अगदी उलट आहे : जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त आनंद देऊ शकते देव त्यांच गोष्टीमध्यें त्याच्या पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण जिवाने आनंद करतो. “मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन” (यिर्मया 32:41) हे शब्द अद्भुत आहेत.
देव आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण जिवाने सार्वकालिक आनंदाच्या शोधाच्या आमच्या ह्या मोहीमेत सामील होतो कारण त्याच्यामध्यें असलेल्या त्या आनंदाचा सर्वोच्च शिखर त्याच्या अपरिमित महानतेचा गौरव आहे.