हे देवा, तुझी आशा धरून राहणार्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचे नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं. (यशया 64:4)
माझ्यासाठीं काम करून देवाला त्याचे देवपण प्रदर्शित करणें आवडते हे सत्य, आणि हे कीं माझ्यासाठीं तो जे करतो ते सर्व मी त्याच्यासाठीं केलेंल्या कोणत्याही कामाअगोदर आहे, कीं बहुंना त्याच्याद्वारे साध्य केलेलीं कृति आहे, मला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक आनंद देणारं आहे.
तो आपल्यासाठीं काम करतो असे म्हणणें प्रथमदर्शनी स्वतःविषयी अभिमान बाळगण्यासारखे आणि देवाला कमी लेखण्यासारखे दिसू शकते. पण असे वाटण्याचे कारण म्हणजें मी एक नियोक्ता आहे आणि देवाला नोकरीची गरज आहे हा चुकीचा संभ्रम. देव हा आपल्यासाठीं काम करतो असें बायबल म्हणते तेव्हा त्याचा तो अर्थ होत नाहीं. देव त्याची “आशा धरून राहणार्यांचे इष्ट काम” करतो असे यशया म्हणतो तेव्हा त्याच्या मनात असला अर्थ अजिबात नव्हतां (यशया 64:4).
देव माझ्यासाठीं काम करतो असे म्हणण्याचा योग्य अर्थ हा आहे कीं मी दीन-दरिद्री आहे आणि मला सुटकेची गरज आहे. मी दुर्बळ आहे म्हणून मला एका सामर्थी व्यक्तीची गरज आहे. माझ्या जिवाला धोका आहे म्हणून मला एका रक्षकाची गरज आहे. मी मूर्ख आहे म्हणून मला कोणीतरी शहाणा अशा व्यक्तीची गरज आहे. मी हरवलेला आहे म्हणून मला सोडविणाऱ्याची गरज आहे.
देव माझ्यासाठीं काम करतो असे म्हणणें म्हणजें मी काम करण्यांस असमर्थ आहे. मला मदतीची नितांत गरज आहे.
आणि ह्यामुळें माझे नव्हे तर देवाचे गौरव होते. गौरव हे देणाऱ्याला प्राप्त होते. स्तुती जो सामर्थ्यवान त्याची केलीं जाते.
देव तुमच्यासाठीं काम करतो याविषयी बायबल काय काय म्हणते ते ऐका आणि स्वतःचा भार उचलून चालण्याच्या ओझ्यातून मुक्त व्हा. ते काम त्याला करू द्या.
1. “हे देवा, तुझी आशा धरून राहणार्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं.” (यशया 64:4).
2. आणि त्याला कांहीं उणें आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकांहीं तो स्वतः सर्वांना देतो” (प्रेषित 17:25).
3. “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).
4. “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो.” (2 इतिहास 16:9).
5. “मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाहीं. . . संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील” (स्तोत्र 50:12, 15).
6. “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन” (यशया 46:4).
7. “तरी जो कांहीं मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केलें” (1 करिंथ 15:10).
8. “परमेश्वर जर घर बांधत नाहीं तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत” (स्तोत्र 127:1).
9. “सेवा करणार्याने, ती आपण देवानें दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा” (1 पेत्र 4:11).
10. “भीत व कापत आपले तारण साधून घ्या; कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13).
11. “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला” (1 करिंथ 3:6).