प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे कीं, “सूड घेणें मजकडे आहे, मी परतफेड करीन,” असे प्रभू म्हणतो.” (रोमकरांस 12:19)
तुमच्या सर्वांवर कधी ना कधी अन्याय किंवा अत्याचार झालाच आहे. शक्यता तुमच्यापैकीं बहुतेकांवर एखाद्या व्यक्तीनें गंभीर अत्याचार केला असेल आणि त्यानें आजपर्यंत क्षमा मागितली नाहीं किंवा त्याची योग्य परतफेड करण्यासाठीं समाधानकारक असे कांहींही केलें नाहीं.
आणि तुमच्या त्या दुखावलेल्या भावना विसरून उद्भवलेली कटुता सोडून देण्याच्या मार्गातील सर्वांत मोठे अडखळण म्हणजें हे ठराविक मत – जे योग्यच आहे – कीं परतफेड केलीं गेलीच पाहिजे, कीं ज्यांच्यावर भयंकर अत्याचार झाला आहे ते लोक अत्याचार करणाऱ्याला जर असेच सुटून जाऊ देतील तर ह्या विश्वाची नैतिक व्यवस्था कोलमडून जाईल आणि प्रत्येकावर अन्याय होईल.
हे ठराविक मत द्वेष सोडून क्षमा करण्यांत अडखळण आहे. परंतु हे एकमेव अडखळण नाहीं. आम्हाला सामोरे गेलें पाहिजे अशी आमची स्वतःची पापे देखील आहेतच. पण खरे अडखळण वर सांगितल्याप्रमाणेंच आहे.
आम्हाला असे वाटते कीं अपराध्यांना दंड न देता मोकळे सोडून देणें म्हणजें आपल्याला न्याय मिळणार नाहीं हे मान्य करणें होय. आणि आम्हांला ते मान्य नसते.
म्हणून आपण आपल्या मनांत राग धरून राहतो, आणि ती घटना किंवा ते शब्द यांची पुन्हा पुन्हा आठवण करून स्वतःच्या भावनांशी खेळतो : असे व्हायला नको होते; असे व्हायला नको होते; जे झालें ते खूप चुकीचे होते; जे झालें ते खूप चुकीचे होते. मी इथे इतका दुःखी आहे आणि तो (किंवा ती) मात्र आनंदी व सुखी आहे, हे कसे? हे खूप चुकीचे आहे. हे खूप चुकीचे आहे! आम्हीं घडलेल्या प्रकाराला असेच विसरू शकत नाहीं. आणि आपल्या अं:तकरणात भरण-पोषण केलेली ही कटुता प्रत्येक गोष्टीला विषाक्त करू लागते.
रोमकरांस 12:19 मधील हे अभिचचन आपल्याला देवानें आपल्यावरील सूडाचे हे ओझे उचलून घेण्यासाठीं दिलें आहे.
” सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.” म्हणजें काय?
क्रोधाचे हे ओझे खाली टाकून देणें, आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने दुःखाचे पोषण करण्याची जणू कांही एक प्रथाच, ती टाकून देणें, याचा अर्थ असा होत नाहीं कीं तुमच्यावर कोणताही मोठा अत्याचार झाला नव्हता. अत्याचार तर झालाच आहे.
पण याचा अर्थ असाही नाहीं कीं न्याय मिळत नाहीं. याचा अर्थ असा नाहीं कीं तुम्हांला निर्दोष सिद्ध केलें जाणार नाहीं. याचा अर्थ असा नाहीं कीं अपराधी असेच मोकळे सुटून गेलेंत. नाहीं, ते असेच मोकळे सुटून गेलें नाहीं.
याचा अर्थ असा कीं, जेव्हा तुम्हीं सूडाचे ओझे खाली टाकतां, तेव्हा परमेश्वर ते उचलतो.
सूड उगण्याचा हा धूर्त मार्ग नाहीं. तर सूड घेणें ज्याच्याकडे आहे त्याला सूड घेण्यासाठीं वाट देणें. सूड घेणें मजकडे आहे, असे प्रभू म्हणतो. तू ते ओझे खाली टाक, मी ते उचलीन. मी परतफेड करीन व तुला न्याय मिळेल. किती अद्भुत सुटका. मला हे ओझे उचलण्याची गरज नाहीं. हे सत्य सुटकेचा नि:श्वास सोडण्यासारखे आहे, कदाचित आयुष्यांत पहिल्यांदाच, आणि असे वाटते कीं आता तुम्हीं आपल्या वैर्यांवर फक्त प्रीति करण्यास मोकळे आहात.