1 October : सर्व-समाधानी विषय

Alethia4India
Alethia4India
1 October : सर्व-समाधानी विषय
Loading
/

परमेश्वरामध्यें आनंद कर, म्हणजें तो तुझे मनोरथ पूर्ण करील. (स्तोत्र 37:4)

आनंदाचा शोध “आम्हांला वाटेल तर आम्हीं घेऊं” असा वैकल्पिक विषय नाहीं, तर ही आज्ञा आहे (स्तोत्रांमध्यें दिलेलीं): “परमेश्वरामध्यें आनंद कर, म्हणजें तो तुझे मनोरथ पूर्ण करील” (स्तोत्र 37:4).

स्तोत्रकर्त्यांनी असेच करण्याचा प्रयत्न केला : “जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठीं धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठीं धापा टाकतो. माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन” (स्तोत्र 42:1-2). “हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे” (स्तोत्र 63:1).

या तहानेच्या उद्देश्यामागे तृप्त करणारा असा समतुल्य झरा आहे जेव्हां स्तोत्रकर्ता म्हणतो कीं लोक “तुझ्या घरातल्या समृद्धीमुळें तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील” (स्तोत्र 36:8).

मला असा शोध लागला कीं देवाचा चांगुलपणा, जो आमच्या उपासनेचा मुख्य पाया आहे, अशी गोष्ट नाहीं कीं तुम्हीं कुठल्यातरी निरुत्साही भक्तीने त्याच्या आदर करता. नाहीं, हे असे कांहींतरी आहे ज्यामध्यें आम्हांला आनंद घ्यावयाचा असतो: “परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा!” (स्तोत्र 34:8). अनुभव. अनुभव! अनुभव घेऊन पाहा.

“तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात!” (स्तोत्र 119:103).

सी.एस. लुईस यांनी म्हटल्याप्रमाणें, स्तोत्रांत वर्णिलेला परमेश्वर हा “सर्व-समाधानी विषय” आहे. त्याच्या लोकांना त्याच्यामध्यें जो “काठोकाठ वाहणारा आनंद” मिळतो त्या आनंदासाठीं ते हर्ष-वर्धनाणें त्याची उपासना करतात (स्तोत्र 43:4). तो तृप्तीदायक आणि सर्वकाळ वाहणाऱ्या आनंदाचा झरा आहे: “तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र 16:11).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *