तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा. कारण हे केवळ पोकळ शब्द नाहींत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडें असलेला जो देश तुम्हीं ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्हीं दीर्घकाल जगाल.” (अनुवाद 32:46-47)
देवाचे वचन म्हणजें थट्टामस्करी नाहीं; हा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. जर तुम्हीं शास्त्रवचनांना खेळ किंवा पोकळ शब्द समजता तर तुम्हीं खऱ्या जीवनास मुकाल.
आपलें हे भौतिक जीवन देवाच्या वचनावर अवलंबून आहे, कारण त्याच्या शब्दाने आपल्याला निर्माण केलें गेले होते (स्तोत्र 33:6; इब्री 11:3), आणि “आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे” (इब्री 1:3).
आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आरम्भ देवाच्या वचनाने होतो : “त्यानें स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने जन्म दिला.” (याकोब 1:18). “देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात” (1 पेत्र 1:23).
आपण देवाच्या वचनाद्वारे केवळ पुन्हा जन्म पावलेले नाहीं, तर आपण जगतो तेही केवळ देवाच्या वचनाने : “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल” (मत्तय 4:4; अनुवाद 8 :3).
तर मग आपलें भौतिक जीवन देवाच्या वचनाद्वारे निर्माण झालें आहे आणि त्याद्वारेच टिकून राहते, त्याचप्रमाणें आपलें आध्यात्मिक जीवन देखील देवाच्या वचनाने नव्याने जन्मलेले आहे आणि टिकून राहते. देवाच्या वचनाच्या जीवन देणाऱ्या सामर्थ्याची साक्ष देण्यासाठीं अशा किती तरी गोष्टी सांगता येतील!
खरंच, बायबल “हे केवळ पोकळ शब्द नाहींत” — ते तुमचे जीवन आहे! सर्व आनंदाचा पाया जीवन आहे. जे चिरकाळ टिकून राहते, म्हणजें ज्याद्वारे आपली निर्मिती झालीं आणि आपल्याला राखले जाते, त्यापेक्षा मूलभूत व महत्वाचे काहींही नाहीं.
हे सर्व केवळ देवाच्या सामर्थ्यवान वचनामुळें आहे. त्याच सामर्थ्याने, तो आमचे आध्यात्मिक जीवन अस्तित्वात आणण्यासाठीं आणि त्याचे पालनपोषण करण्यासाठीं पवित्र शास्त्रात बोलला आहे. म्हणून, बायबल हे केवळ पोकळ शब्द नाहींत, तर तुमचे जीवन आहे – तुमच्या आनंदाचा पाया आणि प्रकाश!