देव मोशेला म्हणाला, “मीं आहें तो आहें.” (निर्गम 3:14)
“मीं आहें तो आहें” (I AM WHO I AM) या पराक्रमी नावाची एक अभिव्यक्ती म्हणजें ही कीं हा अविनाशी, अद्वितीय, सर्वकाहीं पूर्वनियोजित करणारा देव येशू ख्रिस्तामध्यें प्रकट होऊन आपल्याजवळ आला आहे.
योहान 8:56-58 मध्यें येशू यहुदी पुढाऱ्यांनी त्याच्या केलेंल्यां टीकेला उत्तर देत आहे. तो म्हणतो, “तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठीं उल्लसित झाला; तो त्यानें पाहिला व त्याला हर्ष झाला.” तेव्हा यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला अजून पन्नास वर्षे झाली नाहींत आणि तुम्हीं अब्राहामाला पाहिले आहे काय?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”
येशू ह्याहीपेक्षा गौरवी शब्द बोलू शकला असता का? जेव्हा येशू म्हणाला, “अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे,” तेव्हा त्यानें देवाच्या नावाला लागू होणारे असें महान परम सत्य स्वतःसाठीं वापरलें, जो नम्र होऊन दासाचे स्वरूप घेऊन आला, ज्याने आमच्या सर्व अपराधांसाठीं प्रायश्चित करण्यासाठीं स्वतःला अर्पण केलें, आणि आपल्यासाठीं मार्ग मोकळा केला, जेणेंकरून आपल्याला यापुढे कोणतीही भीती न बाळगता या अविनाशी, अद्वितीय, सर्वसमर्थ देवाचा महिमा पाहता यावा.
आपण जें देवापासून जन्मलेलें आहों त्यां आपणाला येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर – जो महान “मीं आहें तो आहें” म्हणजें प्रत्यक्ष देव – त्याला आपला पिता म्हणून ओळखण्याचा अवर्णनीय विशेषाधिकार मिळाला आहे :
- जो आहे
- जो स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि सामर्थ्याचा कर्ता आहे
- जो कधीही बदलत नाहीं
- जो या विश्वात असलेल्या सर्व शक्तींचा आणि सर्व उर्जेंचा प्रवाह आहे
- आणि ज्याचे प्रतिबिंब या संपूर्ण सृष्टीला आपल्या जीवनातून प्रकट करणें अगत्याचे आहे.
देव करो, ज्यांना देवाच्या नावाची ओळख झालेंली आहे त्यांनी त्याजवर आपला भाव ठेवावा (स्तोत्र 9:10).