“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल. . . त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे.” (1 पेत्र 3:10-11)
आपण येशूच्या आज्ञा का पाळत नाहीं याचे एकच मूळ कारण आहे : ते म्हणजें हे कीं आज्ञा न मानण्यापेक्षा आज्ञा पाळल्याने आम्हांला अधिक आशीर्वाद प्राप्त होईल यावर आपला मनापासून विश्वास नसतो. आपण देवाच्या अभिवचनावर पूर्ण आशा ठेवीत जगत नाहीं.
पेत्र येथें कोणते अभिवचन नमूद करतो? येशूनें जे शिक्षण दिलें, पेत्र ते पुढीलप्रमाणें आपल्याला सोपवितो :
वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठीं तुम्हांला पाचारण करण्यात आलें आहे. कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल….त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे. त्यानें शांतीच्या प्राप्तीसाठीं झटावे व तिचा मार्ग धरावा.” (1 पेत्र 3:9-11)
पेत्र, जो येशूचे अनुकरण करत होता, त्यानें आम्हांला कठीण आज्ञां पाळण्यास — जसे कीं वाइटाबद्दल वाईट असे करू नका —प्रवृत्त करण्यास कसलीही लाज धरली नाहीं, आणि त्याबरोबर त्यानें एका मोठ्या हर्षाचे अभिवचनही दिलें. “निंदेबद्दल निंदा असे करू नका, जेणेंकरून तुम्हांला आशीर्वाद प्राप्त व्हावा!” तुम्हांला येणार्या युगात सार्वकालिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे का? तर वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करा! तुमच्यासाठीं युगानुयुगाचा आनंद राखून ठेविलेला आहे! तर मग आता सूड घेण्यांत जो आनंद मिळतो त्यापेक्षा ते प्रतिफळ जर आपण सूड घेणें टाळते तर, अधिक मोठे नाहीं का?
येशूची आज्ञा मोडण्याऐवजी जर तुम्हीं त्याची आज्ञा पाळता तर तुमचे नेहमी कल्याणच होईल, मग त्या आज्ञापालनामुळें तुम्हांला तुमचा जीवहि गमवावा लागला तरी योग्यच. येशूनें म्हटलें,
मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घर-दार, बहीण-भाऊ, आई-बाप, मुले-बाळे किंवा शेती-वाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकींबरोबर शंभरपटीने….येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं. (मार्क 10:29-30)
प्रीतिचे मौल्यवान अर्पण देऊन ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजें आपण दृढ विश्वासाने ही आशा बाळगावी कीं, जर आपण त्याचे आज्ञापालन करतांना आपला जीवही गमावला, तरी आपण तो पुन्हा मिळवू आणि सर्वकाळासाठीं गौरवाच्या प्रतिफळाची कापणी करूं.