तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाहीं, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो. (रोमकरांस 5:9-11)
आपल्याला कशापासून तारले जाण्याची गरज आहे? वचन 9 ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देते : देवाच्या क्रोधापासून. “तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.” पण शुभवर्तमानाचा सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट, पूर्ण, व सर्वात समाधानकारक पुरस्कार केवळ हाच आहे का?
नाहीं, कारण पुढे वचन 10 असें म्हणते, “तर आता….त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत.” मग पुढे वचन 11 निष्कर्षावर येऊन सुवार्तेचा परम शेवट आणि उद्देश काय ते सांगते : “इतकेच केवळ नाहीं… तर… आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.”
शुभवर्तमानाचा अंतिम आणि सर्वोच्च चांगुलपणा हांच आहे. “इतकेच केवळ नाहीं” ह्यानंतर काहींही शिल्लक किंवा अपूर्ण असे काहींही नाहीं. आपलें हे तारण कसे घडून येते हे सांगणें येथें पौलाचा मुख्य हेतू आहे, “ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे.”
सुवार्तेचा शेवट हा कीं “आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.” शुभवर्तमानांत जाहिर केलेंलीं सर्वोच्च, पूर्ण, सखोल, गोड अशी जी गोष्ट आहे ती म्हणजें देव स्वतः, ज्याच्या ठायीं तारलेले सर्व लोग अभिमान बाळगतांत.
परमेश्वर ख्रिस्तामध्यें खंडणी झाला (रोमकरांस 5:6-8), आणि परमेश्वर ख्रिस्तामध्यें पुरस्कारहि बनला (रोमकरांस 5:11).
सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे कीं देवानें आपल्यासाठीं देवाचा सार्वकालिक आनंद खंडणी देऊन विकत घेतला आहे.