पदरात चिठ्ठ्या टाकतांत, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो. (नीतिसूत्रे 16:33)
आधुनिक भाषेत आपण ते ह्या शब्दांत मांडू शकतो, “फासा तर टेबलावर टाकला जातो, पण प्रत्येक बाजी व तिचा शेवट सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.”
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, ह्या जगांत घडणारी अशी कोणतीही लहानांत लहान घटना नाहीं ज्यामागे देवाचा हेतूं नसावा वा जी तो स्वतः घडवून आणत नाहीं. “दोन चिमण्या दमडीला विकतांत कीं नाहीं? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाहीं. तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेलें आहेत” (मत्तय 10:29-30).
तुमच्या शहरातील प्रत्येक फास, हजारो जंगलात भूमीवर पडणारी प्रत्येक लहानात लहान चिमणी – हे सर्व देवाच्या आज्ञेनुसार आहेंत.
योनाच्या पुस्तकात आपण वाचतो कीं परमेश्वर एका प्रचंड माशाला आज्ञा देतो कीं त्यानें एका पुरुषाला गिळंकृत करावें (1:17), तो एका झाडाला सावली द्यावयांस उगविण्याची आज्ञा देतो (4:6), व मग तो एका किड्याला ते झाड सुकविण्याची आज्ञा देतो (4:7).
मासे व किडे यांची सृष्टीच काय, तर तो याहीपेक्षा मोठ-मोठी कृत्यें आज्ञा देऊन करतो, जसे कीं आकाशातील तारे हें देवाच्या आज्ञेनुसार बाहेर येतांत व ते सर्व आपापल्या ठिकाणी स्थिर राहतांत.
आपलें डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केलें? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकीं कोणी उणा पडत नाहीं. (यशया 40:26)
तर मग, या जगात घडणाऱ्या नैसर्गिक घटना किती विशेषकरून त्याच्या आज्ञेप्रमाणें घडून येत असतील– मग ते हवामान असो, विपत्ती असोत वा रोगराई, मनुष्याचे अपंगत्व असो वा मरण.
आपली व्यवस्था तो अंमलात आणतो;
सर्व तारे त्याच्या आज्ञेने गतिमान
सूर्य आपल्या कक्षेत त्याची आज्ञा पाळून चमकतो;
टेकड्या व पर्वत,
नद्या व झरे,
महासागराच्या खोलीही
त्याचे परमेश्वरत्व जाहिर करतांत.
(“ज्यांत काहीं जीवन आहे, ते सर्व,” कॅथरीन डेव्हिस)
यास्तव, ज्याअर्थी आपल्याला हे ठाऊक आहे कीं कोणतीही नैसर्गिक घटना देवाचे ज्ञान व त्याच्या सत्संकल्पानुसार असून त्यां त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाहींत, तर आपण परम आदराने भयभीत होऊन शांत राहू या.