18 July : आध्यात्मिक कृपादानांत असलेली देवाची कृपा

Alethia4India
Alethia4India
18 July : आध्यात्मिक कृपादानांत असलेली देवाची कृपा
Loading
/

प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणें ते एकमेकांच्या कारणी लावा. (1 पेत्र 4:10)

जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग करतो तेव्हा आपण कृपेचे कारभारी म्हणून भूमिका पार पाडत असतो – कालच्या कृपेचे कारभारी नव्हे, तर आजच्या कृपेचे, जी आमच्या गरजेच्या प्रत्येक क्षणी आम्हांला दिली जात असते. आणि ही भविष्यातील कृपा म्हणजें “नानाविध कृपा” आहे. ही कृपा नानाविध रंग आणि नानाविध आकार आणि नानाविध स्वरूपांत येत असते. याच एका कारणामुळें मंडळीत असलेली अध्यात्मिक कृपादाने इतकीं नानाविध आहेत. तुम्हांला देवानें जे कृपादान दिलें आहे त्याचे कार्यकारी गुणधर्म देवाच्या गौरवाच्या अशा छटा नानाविध दाखवेल ज्यां छटा देवानें मला दिलेंल्यां कृपादानांतून कधीही दिसून येणार नाहींत. 

ख्रिस्ताच्या मंडळीत जितक्या नानाविध गरजा आहेत तितक्या नानाविध भावी कृपा आहेत – आणि बरेच काहीं. अध्यात्मिक कृपादानांचा उद्देश त्या गरजा पूर्ण करण्यासाठीं देवाची कृपा प्राप्त करणें आणि ती एकमेकांच्या कारणी लावणें हा आहे.

आता एखाद्याला प्रश्न पडेल, “तुम्हीं भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं पेत्राचेच वचन का घेतले? पुरुष एक कारभारी म्हणून आधीच हाताशी असलेला आपला घरगुती प्रपंच सांभाळत नसतो का?”

भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं मी पेत्राचा उल्लेख केला याचे मुख्य कारण हे कीं हा कारभार कसा साध्य होतो यावर पुढील वचन प्रकाश टाकते, आणि त्या वचनाचा संदर्भ त्या भावी कृपेकडें संकेत देतो जी खंड न पडता पुरविली जाते. ते वचन असे म्हणते, “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.” (1 पेत्र 4:11). मूळ भाषेंत हा शब्दांश “देव पुरवत असलेल्या” आहे, “देवानें पुरवलेल्या” नाहीं. तुम्हीं सेवा करत असताना, तुम्हांला जे करणें अगत्याचे असते ते साध्य करण्यासाठीं देवाच्या सतत पुरवल्या जाणाऱ्या कृपेच्या सामर्थ्याने सेवा करा.

उद्या जेव्हा तुम्हीं ख्रिस्तात असलेल्या एखाद्या बंधूची सेवा करण्यासाठीं तुमचे आध्यात्मिक कृपादान कारणी लावाल तेव्हा तुम्हीं ती सेवा “देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने” कराल — आणि तो पुरवठा आज नाहीं, तर उद्या होईल. “जसे तुमचे दिवस असतील, तसे तुमचे सामर्थ्य असेल” (अनुवाद 33:25 : संपादकाचे भाषांतर).

आपण ज्या सामर्थ्याने सेवा करतो ते “सामर्थ्य” देव आपल्याला दिवसेंदिवस, क्षणाक्षणाला पुरवत असतो. तो असे करतो कारण जो त्या सामर्थ्याचा खंड न पडता पुरवठा करतो त्या अविनाशी देवाचाच त्यामुळें सर्व गौरव होतो. “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा.”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *