प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती.. (प्रेषितांची कृत्ये 4:33)
जर उद्या आपल्यावर अशी वेळ आली कीं ज्यामध्यें आपल्याला ख्रिस्ताची साक्ष काहीं बिकट परिस्थितीत द्यावी लागेल, तर अशा स्थितींस हाताळण्यासाठीं आवश्यक गुरुकिल्ली आमची बुद्धिमत्ता नाहीं; गुरुकिल्ली असेल ती आम्हांवर केलीं जाणारी भावी विपुल कृपा.
इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, प्रेषितांना मरणांतून उठलेल्या ख्रिस्ताविषयीं ठोस आणि विश्वासाकडें घेऊन जाणारी साक्ष देण्यासाठीं कोणाच्या मदतीची गरज वाटली नाहीं असे दिसते. ते तीन वर्षे त्याच्यासोबत होते. त्यांनी त्याला मरतांना पाहिले होते. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर पुनरुत्थानाद्वारे जिवंत झालेंलें पाहिले होते. त्यांच्याकडें असलेल्या साक्षीच्या शस्त्र-सामग्रीत त्यांच्याकडें “पुष्कळ अचूक पुरावे” होते (प्रेषितांची कृत्ये 1:3). तुम्हांला असे वाटेल कीं, इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, मंडळी स्थापनेच्या त्या सुरुवातीच्या दिवसांत साक्षी देण्याचे त्यांचे कार्य त्यांनी भूतकाळात जे गौरव पहिले होते, ज्याची आठवण अद्यापही ताजीतवानी होती, त्या बळावर टिकून राहिलेले असावे.
पण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला तसे सांगत नाहीं. विश्वासूपणाने आणि परिणामकारकपणें साक्ष देण्याचे जे सामर्थ्य त्यांना मिळाले ते मुख्यत्वे ह्यामुळें नाहीं कीं त्यांना त्यांच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेची आठवण होती; तर ते सामर्थ्य त्यांना त्यांच्यावर असलेल्या “मोठ्या कृपेच्या” नवीन आगमनातून मिळाले होते. “त्या सर्वांवर मोठी कृपा होती.” यामुळेंच प्रेषितांनी जें केलें तें ते करू शकलें, आणि आमच्या साक्षी देण्याच्या कार्यात देखील असेच होत असते.
आम्हीं ख्रिस्ताविषयीची साक्ष देत असतांना तिचे सामर्थ्य वाढवण्यासाठीं देवानें कितीही चिन्हे आणि चमत्कार दाखवले तरी ते जसें स्तेफनाच्या साक्षींच्या वेळी घडून आलें तसेच आमच्याही वेळी येतील. “स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे” (प्रेषितांची कृत्ये 6:8). स्तेफनाला सर्व गोष्टींसाठीं आवश्यक असलेली कृपा ही देवाकडून येत होती – अगदी तो मरत असतांना त्याला जे सहन करावे लागणार होते त्यासाठीं देखील.
भावी काळांत आम्हांवर केलीं जाणारी अद्भुत कृपा आणि सामर्थ्य हेच आहे जे आपल्याला एखाद्या विशेष सेवेच्या वेळी ओढवलेल्या संकटात मदत करू शकेल. हे एक नव्याने प्राप्त झालेंल्या सामर्थ्याचे कार्य असते ज्याद्वारे देव “आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष” देतो (प्रेषित 14:3; इब्री 2:4 देखील पहा). सामर्थ्य देणारी ही अखंड कृपा सत्याच्या अखंड कृपेची साक्ष देते.