तुझें चांगुलपण किती थोर आहे! तुझें भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवलें आहेस, तुझा आश्रय करणाऱ्यांसाठीं मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केलें आहेस. (स्तोत्र 31:19).
भविष्यातील कृपेचा अनुभव अनेकदा या गोष्टीवर अवलंबून असतो कीं आपण परमेश्वरामध्यें आश्रय घेणार आहोत, कीं आपण त्याला आपल्यांविषयीं असलेंल्या काळजीबद्दल शंका घेणार व आश्रय मिळविण्यासाठीं दुसऱ्यां कोणत्या ठिकाणी निवारा शोधणार.
जे देवाच्या पंखाखाली आश्रय घेतात त्यांच्यासाठीं, भविष्यातील कृपेची अभिवचनें अनेक आणि संपन्न आहेत.
- त्याचा आश्रय धरणाऱ्या कोणावरही दंडाज्ञा नाहीं. (स्तोत्र 34:22)
- त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. (2 शमुवेल 22:31)
- त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. (स्तोत्र 2:12)
- परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो. (नहूम 1:7)
परमेश्वराठायी शरण घेण्याद्वारें आम्हीं काहींही कमावत नाहीं अथवा आम्हीं कुठल्याही गोष्टीसाठीं पात्र ठरत नाहीं. आम्हीं दुर्बळ आहोत आणि आम्हांला संरक्षणाची गरज आहे म्हणून, लपणें हे आमच्यां आत्मनिर्भरतेची प्रशंसा करणारे कार्य नाहीं. त्याद्वारें फक्त हे दिसून येते कीं आम्हीं स्वतःला लाचार समजतो आणि लपण्याच्या ठिकाणास बचावाचे ठिकाण समजतो.
मीं आताच वर जीं जीं अभिवचनें नमूद केलीं आहेंत त्यां सर्व अभिवचनांमध्यें, देवाकडून मोठ्या आशीर्वादाची अट ही आहे कीं आम्हीं त्याच्याठायी शरण घ्यावी. ही अट गुणसंपन्नतेची नाहीं; ही अट आतुरतेची आणि मान्य केलेंल्या दुर्बळतेची आणि गरजेची व भरवश्याची अभिव्यक्ती आहे.
आतुरता मागणी करीत नाहीं किंवा आम्हांस पात्र ठरवीत नाहीं. ती दयेची याचना करते आणि कृपा मिळविण्यासाठीं झटते.