बंधुजनहो, त्यांच्याविषयीं माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे कीं, त्यांचे तारण व्हावे. (रोम 10:1)
पौल प्रार्थना करतो कीं देवानें इस्राएलाचे तारण करावे. तो त्यांच्या तारणासाठीं प्रार्थना करतो. तो अशी प्रार्थना करीत नाहीं जिचा प्रभावीपणा परिणामशून्य आहे, तर तो अशी प्रार्थना करतो जी प्रभावशाली आहे. आणि आम्हीं देखील अशीच प्रार्थना केली पाहिजे.
आपण देवाच्या नवीन कराराची अभिवचनें घेऊन देवाजवळ विनवणी केली पाहिजे कीं त्यानें ती विनंती आमच्यां मुलांमध्यें आणि आमच्यां शेजार्ंयामध्यें आणि जगाच्या सर्व मिशन क्षेत्रांत पूर्ण करावी.
- परमेश्वरा, त्यांच्या शरीरातून पाषाणहृदय काढून त्यांस मांसाचे नवीन हृदय दे. (यहेज्केल 11:19)
- त्यांच्या हृदयाची सुंता कर यासाठीं कीं त्यांनी तुजवर प्रीती करावी! (अनुवाद 30:6).
- पित्या, त्यांच्याठायी तुझा आत्मा घाल आणि तुझ्या नियमांत त्यांस चालव. (यहेज्केल 36:27)
- त्यांस पश्चाताप आणि सत्याचे ज्ञान दे यासाठीं कीं त्यांनी सैतानाच्या पाशातून सुटावे (2 तीमथ्य 2:25-26)
- त्यांची अंतःकरणें उघड यासाठीं कीं त्यांनी सुवार्तेवर विश्वास करावा! (प्रेषितांची कृत्ये 16:14)
जेव्हां आपण देवाच्या सर्वाभौमत्वावर विश्वास ठेवू – कठोर पातकीं लोकांस निवडण्याच्या आणि मग त्यांना विश्वास आणि तारणाप्रत आणण्याच्या देवाच्या अधिकारावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवू – तेव्हां आपण विसंगतीवाचून, आणि हरविलेंल्यांच्या परिवर्तनासाठीं पवित्र शास्त्रातील थोर अभिवचनांच्या खात्रीनें प्रार्थना करण्यात समर्थ होऊ.
अशाप्रकारे, देवाला या प्रकारच्या प्रार्थनेंत प्रसन्नता वाटते कारण त्याद्वारें त्याला स्वतंत्र आणि सार्वभौम परमेश्वर म्हणून, जो तो तारण आणि निवडीबाबत आहे, अधिकार व आदर प्राप्त होतो.