“पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.” (यशया 66:2)
दीन व भग्न अंत:करणाची प्रथम ओळख ही आहे कीं ते देवाचे वचन ऐकून कंपायमान होते.
यशया 66 अशा कांही लोकांना संबोधून आहे ज्यांपैकीं काहीं अशाप्रकारे उपासना करतात जी देवाला प्रसन्न करते, आणि काहीं जे अशाप्रकारे उपासना करतात ज्यानें तो प्रसन्न होत नाहीं. तिसरे वचन अशा दुष्ट मनुष्याचे वर्णन करते जो असें अर्पण घेऊन येतो : “जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा आहे – जे मनुष्यवधासमान आहेत. का?
चौथ्या वचनात देव स्पष्ट करतो, “कारण मी हाक मारली तेव्हां कोणी उत्तर दिलें नाहीं, मी बोललो तेव्हां त्यांनी माझें ऐकलें नाहीं.” त्यांच्या यज्ञार्पणांचा देवाला तिटकारा होता कारण त्या लोकांनी त्याच्या वाणीकडें दुर्लक्ष केलें. पण त्या लोकांचे काय ज्यांच्या प्रार्थना देवानें ऐकल्या? देव दुसऱ्या वचनात असें म्हणतो, “पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचनें ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडें मी पाहतो.”
या वचनावरून मी असा निष्कर्ष काढतो कीं सरळ अंत:करण असलेंल्या मनुष्याची, ज्याच्या प्रार्थना देवाला प्रसन्न करणार्या असतांत, प्रथम ओळख ही आहे कीं तो वचन ऐकून कंपायमान होतो. हेंच ते लोग आहेत ज्यांच्याकडें परमेश्वर पाहतो.
म्हणून, सरळ मनुष्याची प्रार्थना जी देवाला प्रसन्न करते ती अशा अंतःकरणातून येते जे सर्वप्रथम परमेश्वराच्या सान्निध्यात कंपायमान होते. देवाचे वचन ऐकून ते कंपायमान होते, कारण त्याला देवाच्या आदर्शापासून दूर असल्यासारखे आणि त्याच्या निर्णयापुढे अत्यंत दुर्बळ असल्यासारखे आणि अतिशय लाचार असल्यासारखे वाटते आणि आपण अपयशी आहोत याची त्याला खंत जाणवते.
दावीदानें स्तोत्र 51:17 मध्यें अगदी हेच म्हटलें, “देवाचे यज्ञ म्हणजें भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहींस.” पहिली गोष्ट जिच्यामुळें प्रार्थना देवाला स्वीकारणीय होते ती म्हणजें प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे भग्नहृदय आणि नम्रता. तो त्याचे वचन ऐकून कंपायमान होतो.