“परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठीं तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल.” (अनुवाद 30:9)
देव आपल्यांला अनिच्छेनें आशीर्वादित करत नाहीं. देव आपल्यांवर उपकार करावयांस आवेशी असतो. आपण त्याच्याकडें जावें अशी तो वाट पहात नाहीं. तो आपला शोध करतो कारण त्याचा आनंद आपलें कल्याण करण्यात आहे. देव आपली वाट पाहत बसत नाहीं, तो आपल्यां पाठी येत असतो. स्तोत्र 23:6 चा खरे तर शब्दश: अनुवाद असा आहे कीं “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस कल्याण व दया माझा पिच्छा करतील.
देवाला दया करायला आवडते. मी हे परत सांगतो. देवाला दया करायला आवडते. त्याच्या लोकांचे कल्याण करण्याच्या त्याच्या इच्छे मध्यें संकोच, संदिग्धता किंवा संभावीतपणा नसतो. तो मंदक्रोध आहे आणि करुणा करण्याच्या बाबतींत तत्पर आहे. सिनाय पर्वतावर उतरल्या वर मोशेला तो हेच म्हणाला, “परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर आहे” (निर्गम 34:6). हेच तो यिर्मया 9:24 मध्यें म्हणतो, “मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्यात मला संतोष आहे, असें परमेश्वर म्हणतो.”
देव कधीच वैतागलेंला आणि तणावात नसतो. तो शीघ्रकोपी नाहीं. उलट त्याच्यात त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा अनंत, अमर्याद आणि न संपणारा उत्साह आहे.
याचे आकलन करणें आपल्यां करिता कठीण आहे, कारण प्रत्येक दिवसाला यशस्वी होणें तर सोडाच पण नुसते तोंड देण्याकरिता आपल्यांला विश्रांतीची गरज असते. आपल्यां भावना वर खाली होत असतात. आपल्यांला एक दिवस कंटाळा येतो आणि निराश वाटते, तर दुसर्या दिवशी आपल्यांला आशावादीपणा आणि उत्साह जाणवतो.
आपण त्या पाण्याच्या कारंज्या प्रमाणें आहोत, जो कधी कमी, कधी जास्त आणि अनियमित असतो. पण देव त्या विशाल नायग्राच्या धबधब्या प्रमाणें आहे – तुम्हीं प्रत्येक मिनिटाला 1,86,000 टन पाणी वरून खाली पडताना पाहता आणि विचार करता – नक्कीच हे पाणी ह्या जोरानें वर्षानूवर्षे खाली पडत नसणार. होय ते तसेच पडत आलेलें आहे.
अशाच प्रकारे देव आपलें कल्याण करण्याबाबत असतो. त्याला त्याचा कधी थकवा येत नाहीं. ते त्याला कधीच कंटाळवाणें वाटत नाहीं. त्याच्या नायग्राच्या कृपेच्या धबधब्याला अंत नाहीं.