देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्हीं देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारें आमेन म्हणतो. (2 करिंथ 1:20)
जर “देवाची वचनें कितीही असोत, त्याच्या [येशूच्या] ठायी होय हे आहे” तर मग आता वर्तमानसमयी त्याच्यावर भरवसा ठेवणें म्हणजें हा विश्वास ठेवणें कीं त्याची अभिवचनें पूर्ण होऊन ती खरी सिद्ध होतील.
त्याच्यावर भरवसा ठेवणें आणि त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणें – हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास नाहींत. येशू वर विश्वास ठेवणें – तारणासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणें – म्हणजेंच विश्वास ठेवणें कीं तो त्याचा शब्द पाळतो. वधस्तंभावर खिळलेंला आणि मरणातून पुन्हा उठलेंल्या ख्रिस्तामध्यें समाधानी असणें म्हणजें असा विश्वास ठेवणें कीं भावी काळातील प्रत्येक क्षणापासून ते सर्वकालिकते पर्येंत त्याच्या प्रीति पासून आपल्यांला कोणतीही गोष्ट विभक्त करूं शकणार नाहीं, आणि सर्व गोष्टी आपल्यां कल्याणाकरिता कार्य करण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकणार नाहीं. आणि ते “कल्याण” म्हणजें परमेश्वराला ख्रिस्तामध्यें आपलें सर्वोच्च धन मानणें व त्याचे सौंदर्य न्याहाळणें होय.
आमचे हे सर्व-समाधानकारक कल्याण सर्वकाळासाठीं आहे हा विश्वास आम्हांवर झालेंल्या गतकाळातील गौरवी कृपेवर आधारलेंला आहे, विशेषत: त्यां कृपेवर कीं देवानें आपल्यां स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरिता दिलें (रोमकरांस 8:32).
आता आपण देवानें भूतकाळात जें जें साध्य केलें – विशेषकरून आपल्यां पापांकरिता ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान या द्वारें- आणि त्याच्या सर्व अभिवचनांमध्यें त्याचे अध्यात्मिक सौंदर्य चाखलें पाहिजे. भूतकाळात झालेंल्या कृपेत मुळावलेंला आपला देवावरील भरवसा या गोष्टीना दृढ धरून राहतो कीं देव पुढल्या क्षणी आम्हांबरोबर राहील, व तो तसाच पुढच्या महिन्यात आणि अनंत सार्वकालिकतेसाठीं आम्हांबरोबर असेल.
तोच आणि केवळ तोच आपल्यां आत्म्याचे भावी समयामध्यें समाधान करील. आणि जर आपण मुळावलेलें ख्रिस्ती म्हणून जगण्याकरिता ख्रिस्त आपल्यांला बोलवत असेल तर आपल्यांला आपल्यां भावी जीवनाबद्दल हींच खात्री वाटायला हवी.
ख्रिस्तांत असलेंला आमचा वर्तमान समयीचा आनंद– म्हणजें आमचा वर्तमान विश्वास- जर देवाच्या सर्व अभिवचनांना होय व आमेन म्हणत नसेल, तर मग देव (भविष्यातील प्रत्येक क्षणी) जे सामर्थ्य पुरवेल त्या सामर्थ्यात मुळावलेंली सेवा घडू शकणार नाहीं (1 पेत्र 4:11).
माझी प्रार्थना अशी आहे कीं आपल्यांवर जी भावी कृपा केलीं जाईल तिच्या विश्वासाचे स्वरूप काय आहे यावर अशाप्रकारे चिंतन केल्यांनें आपल्यांला देवाच्या वचनांवर जो विश्वास ठेवायचा आहे त्याविषयींची वरवरची, अतिसरळ विधानें टाळण्यास त्यानें सहाय्य पुरवावें. ही खूप गहन आणि सुंदर गोष्ट आहे.