8  June : तुमच्यां शरीराद्वारें देवाचा गौरव करा

Alethia4India
Alethia4India
8  June : तुमच्यां शरीराद्वारें देवाचा गौरव करा
Loading
/

कारण तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा. ( 1 करिंथ 6:20)

“भक्ती” हा तो शब्द आहे ज्याचा उपयोग आपण अंतकरण, मन आणि शरीराची सर्व कार्य दर्शविण्यासाठीं करतो, ज्याचा हेतु देवाचे असीम मोल व्यक्त करणें आहे. आपण यासाठींच बनवलें गेलें आहोत. ते काम मंडळीमध्यें गीते गाणें असूं शकते. ते स्वयंपाक करणें किंवा लादी पुसणें असूं शकते.

भक्ती किंवा उपासना म्हंटल्यावर केवळ मंडळीमध्यें दर रविवारी सामूहिकरीत्या होणाऱ्या भक्तीचा विचार करूं नका. हा एक मोठा गैरसमज किंवा “भक्ती” या शब्दाची मर्यादित व्याख्या आहे जी पवित्र शास्त्रात नाहीं. आपलें सर्व जीवनच देवाची भक्ती असायला हवे.

तुमच्यां न्याहारीचाच विचार करा, 1 करिंथ 10:31 सांगते, “म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.” आता खाणें किंवा पिणें हे सर्वात मूलभूत आहे. खाणें आणि पिणें याच्यापेक्षा खरे किंवा साधे काय असू शकते? आणि पौल असें म्हणतो कीं आपलें सर्व खाणें आणि पिणें भक्ती प्रमाणें असावे.

किंवा पती-पत्नी मधील परस्पर शारीरिक संबंधच पहा, पौल असें म्हणतो कीं जारकर्माला पर्याय भक्ती आहे,

जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्यां शरीराबाबत पाप करतो. (1 करिंथ 6:18-20)

म्हणजें, तुम्हीं तुमच्यां शरीराद्वारें तुमची लैंगिक इच्छा कशी हाताळता त्यातून तुमची भक्ती व्यक्त होते.

किंवा मरणाकडें एक शेवटचे उदाहरण म्हणून पाहा. आपल्यांला शरीरामध्यें मरणाचा अनुभव होणार आहे. तस पहायला गेलें तर, आपल्यां शरीराद्वारें घडणारे ते शेवटचे कार्य आहे. आपलें शरीर जगाचा निरोप घेते. मग आपण आपल्यां ह्या शेवटच्या कृती द्वारें भक्ती कशी करणार? याचे उत्तर फिलिप्पै 1:20-21 मध्यें आहे. पौल म्हणतो कीं त्याची आशा आहे कीं ख्रिस्त गौरवला जावा – त्याच्या मरणाच्या शरीराद्वारें त्याची भक्ती व्हावी, आणि तोच योग्य आहे हेच प्रतीत व्हावे. मग तो पुढे म्हणतो, “माझ्यासाठीं …. मरणें हे लाभ आहे.” आपण आपलें मरण हे लाभ आहे असें जेव्हां म्हणतो तेव्हांच ख्रिस्ताचे अनंत मोल व्यक्त करतो.

होय तुम्हांला शरीर आहे. पण ते तुमचे नाहीं. “तुम्हीं मोलानें विकत घेतलेलें आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारें देवाचा गौरव करा”

तुम्हीं नेंहमीच मंदिरात आहात. नेंहमी भक्ति करा.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *