“त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसऱ्यांदा दिसेल.” (इब्री 9:28)
आपल्या सर्वांसमोर जो प्रश्न आहे तो हा: ख्रिस्ताने ज्यांची पापे वाहून नेली त्या “पुष्कळ” लोकांमध्यें आपला समावेश आहे का? आणि तो दुसऱ्यांदा दिसेल त्यां वेळी आपण तारले जाऊ का?
इब्री 9:28 चे उत्तर आहे, “होय,” जर आपण “त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.” आपण जाणू शकतो कीं आपली पापे वाहून नेण्यात आली आहेत आणि न्यायनिवाडा होईल त्यां दिवशी आपण सुरक्षित असू, जर आपण ख्रिस्तावर अशाप्रकारे विश्वास ठेवतो कीं तो विश्वास आम्हास त्याच्या आगमनासाठीं उत्सुक करतो.
एक नकली, बनावटी विश्वास आहे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा दावा करतो, परंतु केवळ अग्नि विमा धोरण आहे. नकली विश्वास नरकापासून बचाव करण्यासाठीं “विश्वास ठेवतो.” त्याला ख्रिस्तासाठीं खरी इच्छा नसते. खरे म्हणजें, तो न आल्यास त्याला आवडेल, यासाठीं कीं आपल्याला या जगाच्या सुखांचा होईल तितका आस्वाद घेता यावा. यावरून दिसते कीं ते हृदय ख्रिस्तासोबत नाहीं, जगासोबत आहे.
तर, आपल्यासाठीं मुद्दा हा आहे कीं आपण ख्रिस्ताच्या आगमनाची उत्कंठेने वाट पाहत आहोत का? कीं जगासोबत आपले प्रेमसंबंध सुरू असताना त्यानें आमच्यापासून दूर राहावे असें आम्हास वाटते? हाच प्रश्न आहे जो विश्वासाच्या खरेपणाची पारख करतो.
“आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट” पाहत असतांना आपण करिंथकरांसारखे बनावे (1 करिंथ 1:7) आणि फिलिप्पैकरांसारखे ज्यांचे ”नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत“ (फिलिप्पै 3:20).
आमच्यासाठीं हा मुद्दा आहे. त्याचे प्रगट होणे आपल्याला आवडते का? किंवा आपले जगावर प्रेम आहे आणि आम्हीं आशा करतो कीं त्याचे प्रगट होणे आपल्या योजनांमध्यें अडखळण आणणार नाहीं? या प्रश्नावर अनंतकाळ अवलंबून आहे.