“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेंल्यांना मी असे म्हणतो: तुम्हीं घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठीं परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित” (यिर्मया 29:4,5,7).)
जर बाबेल येथील देवाच्या बंदिवासातील लोकांसाठीं ते खरे होते, तर या “बाबेलसारख्या” जगातल्या ख्रिस्ती निर्वासितांसाठीं ते आणखी खरे ठरेल. मग आपण काय करावें?
ज्या सामान्य गोष्टी करण्याची गरज आहे त्या केल्या पाहिजेत: घरे बांधणे; त्यात राहणे; बाग लावणे. हे सर्व तुम्हीं खऱ्या राजासाठीं केलेंत आणि फक्त माणसांना खूश करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर हे तुम्हांला दूषित करत नाहीं.
देवानें तुम्हांला ज्या ठिकाणी पाठवले आहे त्या ठिकाणाचे हितचिंतन करा. देवानें तुम्हांला त्याच्या गौरवासाठीं पाठवले आहे असे आपणाविषयी माना. कारण तुम्हांला त्याच्या गौरवासाठींच पाठवले आहे.
तुमच्या शहराच्या वतीने देवाकडें प्रार्थना करा. शहरासाठीं मोठ्या आणि उत्तम गोष्टी घडाव्या म्हणून प्रार्थना करा. विनंती करा कीं ते देवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या गौरवाप्रीत्यर्थ घडावे. शहराला भौतिक समृद्धीची गरज आहे त्यापेक्षा हजारपटीने जास्त ज्या अंतिम चांगल्याची गरज आहे त्याकडें कधीही दुर्लक्ष करू नका. ख्रिस्ती लोक सर्व दुःखांची पर्वा करतात – विशेषतः शाश्वत दुःख. प्रत्येक शहराला भेडसावणारा या सर्वात मोठ्या संकटास सामोरे जावें लागेल.
परंतु देव किंवा त्याचे लोक शहराचे आरोग्य, सुरक्षा आणि समृद्धी आणि स्वातंत्र्य यांबाबत बेपर्वा नाहींत. आम्हा सर्वांना या गोष्टींची गरज आहे, आणि येशूनें म्हटलें, “तू तुझ्या शेजाऱ्यावर तुझ्यासारखी प्रीति कर” (मत्तय 22:39). खरे म्हणजें, प्रभु यिर्मयामध्ये म्हणतो कीं तुमच्या शहरावर प्रीति करणे हा स्वतःवर प्रीति करण्याचा एक मार्ग आहे: “त्या नगराचे हित ते तुमचे हित.”
याचा अर्थ असा नाहीं कीं आपण या जगांत प्रवासी म्हणून आपली दिशाभिमुखता सोडतो. पेत्र म्हणतो कीं ख्रिस्ती लोक “प्रवासी आणि परदेशवासी” आहेत (1 पेत्र 2:11) आणि पौल म्हणतो, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे” (फिलिप्पै 3:20). वस्तुतः, या जगाच्या भुलविणाऱ्या आकर्षणांपासून स्थिरपणे दूर राहून आपण या जगाचे जास्तीत जास्त हित करू. “जे नगर पुढे येणार आहे” (इब्री 13:14) त्यातून आपली मूल्ये प्राप्त करण्याद्वारे आम्हीं आपल्या शहराची उत्तमप्रकारे सेवा करू. “वर असलेल्या यरूशलेम” चे नागरिक होण्यासाठीं आम्हीं आपल्या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना बोलावून आम्हीं आपल्या शहराचे सर्वात हितचिंतन करू (गलती 4:26).
तर, चला जगूया – शक्य तितके हितचिंतन करूया (1 पेत्र 2:12) – कीं स्थानिकांना आमच्यां राजाला भेटावेसे वाटेल-