
“निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीं.” (स्तोत्र 32:9).
असे कल्पनाचित्र रंगवा कीं देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे आहे ते दाखवतो, आणि त्यांच्या जीवनासाठीं धान्याचे कोठार बांधतो.
परंतु प्राण्यांच्या ह्या खळ्यांत एक जनावर आहे जे देवाला भयंकर त्रास देते, ते म्हणजें खेचर. ते मूर्ख आहे आणि ते हट्टी आहे आणि यांपैकीं कोणता अवगुण प्रथम आहे हे तुम्हीं ओळखू शकत नाहीं – हट्टीपणा कीं मूर्खपणा.
आता देव ज्या प्रकारे त्याच्या प्राण्यांना अन्न देण्यासाठीं आणि त्यांना निवारा देण्यासाठीं कोठारात नेतो ते हे शिकवून कीं त्यांना सर्वांना एक वैयक्तिक नाव आहे आणि नंतर त्यांना नावाने हाक मारणे. ”मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन” (स्तोत्र 32:9).
पण खेचर त्या प्रकारच्या बोधाला किंवा मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाहीं. त्याला समज नाहीं. म्हणून देव त्याच्या पिक-अप ट्रकमध्ये बसतो आणि शेतात जातो, खेचराच्या तोंडात ओठाळी आणि लगाम घालतो, त्याला ट्रकला जुंपतो आणि त्याला ओडत खळ्यात नेतो जेथे तो ताठ पायांनी आणि फुरफुरत जातो.
देवाची अशी पद्धत नाहीं कीं त्याच्या प्राण्यांनी त्याच्याकडें आशीर्वाद आणि संरक्षणासाठीं अशाप्रकारे यावे.
पण एक दिवस असा येईल जेव्हां त्या खेचराला खूप उशीर झालेंला असेल. त्याच्यावर गारांचा वार होणार आहे आणि विजेचा कडकडाट होणार आहे, आणि जेव्हां तो धावत येईल तेव्हां खळ्याचे दार बंद झालेंलें असेल.
म्हणून, खेचरांसारखे होऊ नका. “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठीं लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहींत.”
त्याऐवजी, देव पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याला प्रार्थना करावी (स्तोत्र 32:6).
खेचरासारखे न होणें म्हणजें स्वतःला नम्र करणे, प्रार्थनेत देवाकडें येणे, आपली पापे कबुल करणे आणि शेतातील गरजू लहान पिल्लांप्रमाणे त्याच्या संरक्षणाच्या आणि तरतूदीच्या खळ्यात जाण्यासाठीं देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे.