सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यापासून पळून जाईल. (याकोब 4:7)
आपल्या दिवसात सैतान जितका वास्तविक दिसतो – अधिक प्रकटरित्या सक्रिय – ख्रिस्ताचा विजय त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीं अधिक मूल्यवान ठरेल.
नवा करार शिकवतो कीं जेव्हां ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां सैतानाचा कायमचा निर्णायक पराभव करण्यात आला. त्याला मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले आहे, परंतु देवाच्या लोकांविरुद्ध त्याचे सामर्थ्य मोडकळीस आले आहे आणि त्याचा नाश निश्चित आहे.
- सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला(1 योहान 3:8)
- ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे. (इब्री 2:14)
- त्यानें सत्ताधीशांना व अधिकार्यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केलें. (कलसै 2:15)
दुसऱ्या शब्दांत, निर्णायक वार कल्वरी येथे करण्यात आला. आणि एक दिवस येईल, जेव्हां सैतानाचा मर्यादित स्वातंत्र्याचा काळ देखील समाप्त होईल, प्रकटीकरण 20:10 “त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; …तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.”
आपल्यापैकीं जे येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतात त्यांच्यासाठीं याचा काय अर्थ आहे?
- म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच. [ते देहाप्रमाणे नाहीं तर आत्म्याप्रमाणे चालतात.] (रोमकरांस 8:1)
- देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. (रोमकरांस 8:33)
- कारण माझी खातरी आहे कीं, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं. (रोमकरांस 8:38–39)
- जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. (1 योहान 4:4)
- त्याला त्यांनी कोकर्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. (प्रकटीकरण 12:11)
म्हणून, “सैतानाचा प्रतिकार करा, आणि तो तुमच्यापासून पळून जाईल!“ त्याचा पराजय झाला आहे, आणि आम्हांला विजय देण्यात आला आहे. आता आमचे कार्य आहे त्या विजयात जगणे आणि सैतानाला त्याच्या पराभवाविषयी जाणीव करून देणें.