2 April : एव्हरेस्ट पर्वतापेक्षा उत्तम

Alethia4India
Alethia4India
2 April : एव्हरेस्ट पर्वतापेक्षा उत्तम
Loading
/

परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणाऱ्यांना म्हणजें त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. (रोम 8:28)

जर तुम्हीं या भव्य अभिवचनात राहत असाल, तर तुमचे जीवन एव्हरेस्ट पर्वतापेक्षा अधिक मजबूत व स्थिर आहे.

जेव्हां तुम्हीं रोम 8:28 च्या तटबंदीच्या आत असता तेव्हां कोणतीहि गोष्ट तुम्हांला पराभूत करू शकत नाहीं. रोम 8:28 च्या बाहेर, सर्वकाहीं गोंधळ आणि चिंतांतुरता आणि भीती आणि अनिश्चितता आहे. देवाच्या सर्वसमावेशक भावी कृपेच्या या वचनाच्या बाहेर, ड्रग्ज आणि अश्लीलता आणि डझनभर व्यर्थ करमणूकीं आहेत. या जगांत ठिसूळ गुंतवणूक धोरणांच्या आणि क्षणभंगुर विमा संरक्षणाच्या आणि क्षुल्लक सेवानिवृत्ती योजनांच्या पातळ भिंती आणि टिनाची छप्परे आहेत. डेडबोल्ट कुलुप आणि अलार्म प्रणाली आणि अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या निव्वळ पुठ्याने बनलेल्या तटबंदी आहेत. रोम 8:28 ची जागा घेणारे एक हजार उलट उपाय आहेत.

एकदा का तुम्हीं प्रीतिच्या दारातून प्रवेश करून रोम 8:28  च्या अफाट, अढळ इमारतीत गेलात कीं सर्वकाहीं बदलून जाते. तुमच्या जीवनात स्थैर्य आणि खोली आणि स्वातंत्र्य येते. तुम्हीं यापुढे पराभूत केलें जाऊ शकणार नाहीं. सार्वभौम परमेश्वर देव तुम्हीं कधी अनुभवाल अशा तुमच्या सर्व दुःखांवर आणि सर्व सुखांवर तुमच्या भल्याकरिता शासन करतो हा विश्वास हा तुमच्या जीवनातील एक अतुलनीय आश्रय आणि सुरक्षितता आणि आशा आणि बळ आहे.

जेव्हां देवाचे लोक रोम 8:28  च्या – गोवर ते शवागारापर्यंत – भावी कृपेच्या प्रकाशझोतांत जगतात तेव्हां ते जगातील सर्वाधिक स्वतंत्र आणि बलवान आणि सर्वात उदार लोक ठरतात.

त्यांचा प्रकाश चमकतो आणि लोक त्यांच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतांत (मत्तय 5:16).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *