आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्हीं निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्यानें स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. (1 करिंथ 1:8-9)
येशू येईपर्यंत तुमचा विश्वास टिकेल याची खात्री करण्यासाठीं तुम्हीं कशावर अवलंबून आहात? प्रश्न हा नाहीं कीं, तुम्हीं सार्वकालिक सुरक्षेवर विश्वास करता का? प्रश्न हा आहे कीं आम्हास कसे सुरक्षित ठेवले जाते?
आपल्यां विश्वासाची चिकाटी आपल्यां स्वतःच्या संकल्पाच्या विश्वसनीयतेवर निर्णायकपणे अवलंबून असते का? कीं ती आम्हास “आमच्या विश्वासात टिकवून ठेवण्यासाठीं“ देवाच्या कार्यावर निर्णायकपणे अवलंबून आहे?
हे पवित्र शास्त्राचे एक थोर आणि अद्भुत सत्य आहे कीं देव विश्वासू आहे आणि ज्यांना त्यानें पाचारण केलें आहे त्यांना तो सदाकाळ सुरक्षित ठेवेल. आपण सार्वकालिकरित्या सुरक्षित आहोंत हा आपला विश्वास म्हणजे “आम्हांला विश्वासात टिकवून ठेवण्यासाठीं“ जे काहीं आवश्यक असेल ते देवच करेल हा विश्वास!
सार्वकालिकतेची खात्री ही या खात्रीपेक्षा मोठी नाहीं कीं देव आता आम्हास विश्वासात टिकवून ठेवेल. परंतु देवानें ज्यांना पाचारण केलें आहे त्यांच्यासाठीं ही खात्री फार मोठी आहे.
किमान तीन शास्त्र-संदर्भ अशा प्रकारे देवाचे पाचारण आणि देवाचे राखून ठेवणें अशाप्रकारे एकत्र मांडतांत.
1. आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्हीं निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्यानें स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. (1 करिंथ 1:8-9)
2. “शांतीचा देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच” (1 थेस्सल 5:23-24).
3. “देवपित्यानें पवित्र केलेंले आणि येशू ख्रिस्तासाठीं राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून : दया, शांती व प्रीति ही तुम्हांला विपुल मिळोत” (यहूदा 1-2). (रोम 8:30, फिलिप्पै 1:6, 1 पेत्र 1:5 आणि यहूदा 24 मध्यें हीच वास्तविकता पहा.)
देवाचा “विश्वासूपणा” याची हमी देतो कीं त्यानें ज्यांना बोलाविले आहे त्या सर्वांस तो सर्वकाळ राखील.