“आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्हीं अजून आपल्यां पापांतच आहात.” (1 करिंथकरांस 15:17)
येशूच्या पुनरुत्थानाविषयीं येथे दहा आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यांविषयी आपण ख्रिस्ताचे ऋणी असायला पाहिजे :
1) एक असा तारणकर्ता ज्याला पुन्हा कधीही मरण येणार नाहीं. “आपल्यांला ठाऊक आहे कीं, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाहीं; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाहीं” (रोमकरांस 6:9).
2) पश्चात्ताप. “ज्या येशूला तुम्हीं खांबावर टांगून मारले त्याला आपल्यां पूर्वजांच्या देवानें उठवले. त्यानें इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवानें त्याला आपल्यां उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले” (प्रेषित 5:30-31).
3) नवा जन्म. “जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठीं, त्यानें आपल्यां महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारें आपल्यांला पुन्हा जन्म दिला” (1 पेत्र 1:3).
4) पापाची क्षमा. “आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्हीं अजून आपल्यां पापांतच आहात” (1 करिंथ 15:17).
5) पवित्र आत्मा. “त्या येशूला देवानें उठवले ह्याविषयी आम्हीं सर्व साक्षी आहोंत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडें बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्हीं जे पाहता व ऐकता त्याचा त्यानें वर्षाव केला आहे” (प्रेषित 2:32-33).
6) निवडलेल्यांसाठीं दंडाज्ञा नाहीं. “तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाहीं, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडें आहे आणि जो आपल्यांसाठीं मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोमकरांस 8:34).
7) आम्हांबरोंबर येशूची वैयक्तिक सहभागिता आणि संरक्षण. “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” (मत्तय 28:20).
8) येणाऱ्या न्यायनिवाड्याचा पुरावा. “ [देवानें] असा एक दिवस नेमला आहे कीं, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्यां मनुष्याच्या द्वारें जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्यानें त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे” (प्रेषित 17:31).
9) देवाच्या भावी क्रोधापासून तारण. “[आम्हीं] त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट [पाहतो]…………त्या पुत्राला म्हणजे येशूला देवानें मेलेल्यांतून उठवले व तो आपल्यांला भावी क्रोधापासून सोडवणार आहे” (1 थेस्सलनी 1:10; रोमकरांस 5:9).
10) मरणातून आमचे स्वतःचे पुनरुत्थान. “हे आम्हांला ठाऊक आहे कीं, ज्यानें प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील” (2 करिंथ 4:14; रोमकरांस 6:4; 8:11; 1 करिंथ 6:14; 15:20).