ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत. (2 पेत्र 1:3)
पवित्र शास्त्र ज्यां सामर्थ्याचे श्रेय ज्ञानाला देते ते पाहून मी चकित होतो.
परत एकदा वाचा 2 पेत्र 1:3 : ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें त्याच्या (देवाच्या) ओळखीच्या द्वारें, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्यां सर्व गोष्टी आपल्यांला दिल्यां आहेत.
अक्षरशः, जीवन जगण्यासाठीं आणि भक्तीमान होण्यासाठीं देवाकडून जे सामर्थ्य उपलब्ध आहे ते सर्व ज्ञानाद्वारें उपलब्ध आहे! अद्भुत! शास्त्रवचनांतील सिद्धांत आणि शिकवणीवर आपण किती जोर द्यायला पाहिजे! हा साधारण विषय नाहीं, हा जीवन व सुभक्तीचा गंभीर विषय आहे.
विषय हा नाहीं कीं ज्ञानामुळे सुभक्तीमानतेची हमी प्राप्त होते. तसे नाहीं. पण असे दिसून येते कीं अज्ञान अभक्तीची हमी देते. कारण, पेत्र म्हणतो, सात्त्विकतेकडें नेणारे ईश्वरी सामर्थ्य देवाच्या ओळखीच्या द्वारें म्हणजेच ज्ञानाद्वारें दिले जाते.
येथे तीन अर्थ, एक ताकींद, व एक उत्तेजन आहे.
1. वाचा! वाचा! वाचा! पण ईश्वरविज्ञानाच्या बाह्य फेणावर आपला वेळ वाया न घालविण्याविषयी सावध असा. “ज्यानें तुम्हाआम्हांला आपल्यां गौरवासाठीं व सात्त्विकते-साठीं पाचारण केलें” त्याच्याविषयी समृद्ध सिद्धांत विषयक पुस्तके वाचा.
2. मनन करा! मनन करा! शांतचित्त व्हां. तुम्हीं बायबल वाचता तेव्हां त्याच्या अर्थ काय, याविषयी विचार करण्यात वेळ घालवा. प्रश्न विचारा. मनन नमूद करण्यासाठीं जवळ एक दैनंदिनी ठेवा. पेचांत टाकणाऱ्या गोष्टींद्वारें स्वतःचे मन नम्रपणे विव्हळ होऊ द्या. सत्याच्या वृक्षावरील वरवर पाहता दिसणाऱ्या दोन परस्पर विरोधी शाखांचे एकत्रित करणारे मूळ पाहण्याचा प्रयत्न करण्याद्वारें सखोल अंतर्दृष्टी प्राप्त होते.
3. चर्चा करा. चर्चा करा. एका लहान गटाचा भाग बना जो सत्याची उत्कटपणे पर्वा करतो. असा गट नाहीं ज्याला फक्त बोलून समस्या उत्पन्न करणे आवडते. पण असा गट ज्याचा असा विश्वास आहे कीं बायबलच्या प्रश्नांची उत्तरे बायबल मध्येंच आहेत आणि ती शोधून काढता येतात.
ताकींद : “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे” (होशे 4:6).“मी त्यांच्याविषयी साक्ष देतो कीं, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाहीं” (रोमकरांस10:2). म्हणून अज्ञानाच्या घातक परिणामांविषयी सावध असा.
उत्तेजन : “चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू” (होशे 6:3).