“जो आपल्यां उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्यास धिक्कार असो! तो मातीच्या खापर्यापैकीं एक आहे. तू काय करतोस असे माती आपल्यां घडणा-याला म्हणेल काय? तुला हात नाहींत असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?” ( यशया 45:9)
देवाचा प्रतापीपणा अधिक उंचविला जातो जेव्हां आपण त्याच्याकडें एक निर्माणकर्ता ज्यानें शून्यातून हे विश्व निर्माण केलें, या दृष्टीने पाहतो. देव शून्यतेला आज्ञा करतो, आणि ती त्याची आज्ञा पाळते आणि शून्यातून विश्व निर्माण होते.
शून्यातून त्यानें माती घडवली, व त्या मातीतून त्यानें आपल्यांला घडवले- देवाची कलाकृती (यशया 45:9) – त्याच्या मालकींचे लोक, त्याच्या गौरवाकरिता नेमून ठेवलले व त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले. “परमेश्वर हाच देव आहे हे जाणा ; त्यानेंच आम्हांला उत्पन्न केलें; आम्हीं त्याचेंच आहों, आम्हीं त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहों” (स्तोत्र 100:3). दुसर्याच्या मालकींचे मेंढरू व पात्र असणे ही एक नम्र करणारी गोष्ट आहे.
आज सकाळी मी यशयाचे पुस्तक वाचत असताना मला देवाच्या प्रतापीपणाविषयीं आणखी एक वचन सापडले. जेव्हां मी ते वचन देवाच्या संपूर्ण सामर्थ्याशी व उत्पन्नकर्त्याच्या असलेल्यां अधिकाराशी एकत्र केलें, तेव्हां त्याचें एक ज्वलंत मिश्रण होऊन माझ्या मनात एक स्फोट झाला. धडाम!
यशया 33:21 म्हणते, “प्रतापी परमेश्वर आम्हांसाठीं असेल!”
आम्हांसाठीं! आम्हांसाठीं! निर्माणकर्ता आम्हांसाठीं आहे, आमच्या विरुद्ध नाहीं. सर्व शक्तिनिशी आणि जे त्यानें घडवले आहे त्यावर संपूर्ण अधिकारासह – तो आम्हांसाठीं आहे!
“हे देवा, तुझी आशा धरून राहणार्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाहीं, त्याचें नाव आलेले नाहीं, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाहीं” (यशया 64:4). “देव आपल्यांला अनुकूल असल्यांस आपल्यांला प्रतिकूल कोण?” (रोम 8:31).
तुम्हीं आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करू शकता का, जी इतकीं सांत्वन देणारी, खात्री देणारी व आनंद देणारी आहे कीं, हा प्रतापी परमेश्वर तुमच्यासाठीं आहे?