March 10 : आपण कोकर्‍याची भक्ति करूया

Alethia4India
Alethia4India
March 10 : आपण कोकर्‍याची भक्ति करूया
Loading
/

ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मला फार रडू आले “. (प्रकटीकरण 5:4)

तुम्हीं कधी असा विचार केला आहे का, कीं तुमच्या प्रार्थना स्वर्गामधील सुवासा सारख्या आहेत?  प्रकटीकरण 5 वाचल्यांवर हेच चित्र समोर तयार होते. स्वर्गामधील जीवनाची ही एक झलक आहे.

प्रकटीकरण 5 मध्यें आपण पाहतो कीं, सर्वसमर्थ देव हातामध्यें गुंडाळी घेऊन राजासनावर बसला आहे. या गुंडाळीवर सात शिक्के आहेत. ती गुंडाळी उघडण्यासाठीं हे सात शिक्के फोडावे लागणार आहेत.

मला असे वाटते कीं गुंडाळीचे उघडणे हे मुक्तिच्या इतिहासाच्या शेवटच्या दिवसाचे दर्शक आहे, आणि शिक्क्यांचे फोडले जाणे हे आपली त्या दिवसाकडील वाटचालीच्या इतिहासाचे दर्शक आहे.

प्रकटीकरण 5:4 मध्यें सुरवातीला, योहान रडत असतो कारण ती गुंडाळी उघडण्यास कोणी योग्य नाहीं. तेव्हां स्वर्गातील वडीलमंडळापैकीं एक जण योहानाला म्हणतो कीं, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे” ( प्रकटीकरण 5:5).

क्रूसावरील मरण स्वीकारून, येशूनें  मुक्तिच्या इतिहिसातील होऊ घातलेल्यां घटनां उघडण्याचा व त्याच्या लोकांना त्यातून विजयी वाटचाल करीत नेण्याचा अधिकार मिळवला.

पुढच्या वचनामध्यें, सिंहाचे चित्रण कोक-या प्रमाणे करण्यात आले आहे, “ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पहिला” (प्रकटीकरण 5:6). येशूच्या क्रूसावरील विजयाचे हे सुंदर चित्रण आहे, नाहीं का? वधला असला तरी, उभा असलेला, खाली झोपलेला नाहीं!

हे तितक्याच खात्रीचे आहे जसे सिंहाने त्याच्या शत्रूला गिळंकृत केलें आहे – पण त्यानें हा विजय त्याच्या शत्रूंकडून स्वत:चा वध करून प्राप्त केला आहे !

त्यामुळे, कोकरा आता देवाच्या हातातून मुक्तीच्या इतिहासाची गुंडाळी घेऊन उघडण्यास समर्थ झाला आहे. हा किती राजेशाही क्षण आहे, जेव्हां स्वर्गामधील चोवीस वडील भक्ति करण्यास त्याच्या पाया पडत आहेत.

तुम्हांला ठाऊक आहे का, कीं धुपाने भरलेल्यां सोन्याच्या वाट्या काय आहेत? प्रकटीकरण 5:8 सांगते कीं “त्या पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.” याचा अर्थ असा होत नाहीं का, कीं आपल्यां प्रार्थना स्वर्गातल्यां सुगंधा प्रमाणे आहेत, देवाच्या राजासना समोर व कोक-या समोर एका सुवासा प्रमाणे आहेत?

जेव्हां मी विचार करतो कीं माझ्या प्रार्थना साठवून ख्रिस्ताच्या स्वर्गातील भक्तिमध्यें सादर केल्यां जातात, तेव्हां मला अधिक जोमाने प्रार्थना करण्याचे सामर्थ्य व उत्तेजन प्राप्त होते.

तर आपण खाली आपल्यां प्रार्थनांद्वारें ख्रिस्ताला मान, गौरव व आपली भक्ति सादर करू, आणि आपल्यां प्रार्थना स्वर्गीय मंडळीद्वारें ख्रिस्त, जो वधला गेला होता, त्याला सुंगधी धुपाप्रमाणे सादर केल्यां जातात यात दुहेरी आनंद मानू.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *