“मी त्यांजशी सर्वकाळचा करार करी; तो असा कीं मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं …. मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन.” (यिर्मया 32 :40–41 )
जेव्हां जेव्हां मी निराश होतो, तेव्हां तेव्हां मी देवाच्या ज्यां अनेक वचनांकडें पुन्हा पुन्हा परत येतों, त्यांपैकींच हें एक वचन आहे. देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो, यापेक्षा उत्तजेन देणा-या कोणत्या गोष्टीचा तुम्हीं विचार करू शकता का ? देव केवळ तुमचे हित करतो म्हणून नव्हे. केवळ तुमचे हित करण्याचे आश्वासनच नव्हे – हे कितीही गौरवी असेल तरीही, तर हें कीं देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो,”मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन. ” अहाहा!
रोम 8:28 यातील सर्व काहीं आपल्यां भल्यांसाठीं करण्याच्या अभिवचनाची पूर्तता तो नाखुशीनी करत नाहीं. आपले हित करण्यात त्याला आनंद मिळतो. आणि तो आनंद केवळ कधीतरीच नाहीं – तर सर्वदा! ” मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाहीं.” जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याबाबतींत तो त्याचें अभिवचन रद्द करत नाहीं किंवा त्याच्या लेकरांचे कल्यांण करण्याविषयीं आपला आनंद गमावत नाहीं.
ह्या गोष्टीने आपल्यांला आनंद व्हावयाला पाहिजे!
पण कधी कधी आनंद वाटणे अवघड होतं. आपली परिस्थिति आपल्यां सहनशीलते पलीकडें होते ज्यांमुळें आनंद पावणे शक्य होत नाहीं. माझ्या बरोबर जेव्हां असे होते तेव्हां मी अब्राहमाचे अनुकरण करतो : “आशेला जागा नसताही त्यानें आशेने विश्वास ठेवला” (रोम 4:18). दुसर्या शब्दांत, जेव्हां तुम्हीं तुमच्या आशाहीन परिस्थितिकडें पाहतां, तेव्हां तुम्हांला असें म्हणायचे आहे, “तू माझ्या देवाइतका सामर्थ्यशाली नाहींस! तो तर जें अशक्य ते करू शकतो. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता तो प्रीतिने हे करतो, यासाठींच निराशेकडें अंतिम अधिकार नाहीं. मी देवावर विश्वास ठेवतो.
माझ्या मधील असलेल्यां विश्वासाच्या लहानश्या ठिणगीचे रक्षण करण्यास देव विश्वासू आहे आणि (लगेचच नाहीं) तर अखेरीस तो आनंदाच्या व विश्वासाच्या भावना चेतवतो. आणि त्याचा तो आनंद यिर्मया 32:41 मध्यें दडलेला आहे.
मी किती आनंदी आहे कीं देवाच्या अंतकरणाला तुमचे आणि माझे कल्यांण करण्यात देखील आनंद प्राप्त होतो! “मी त्यांचे हित करण्यांत आनंद पावीन.“