2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा

Alethia4India
Alethia4India
2 March : अभिवचनांनी आपणांस सज्ज करा
Loading
/

” जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ” ( मत्तय 5:8 )

जेव्हां पौल म्हणतो कीं “आत्म्याने” शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13 ), याचा अर्थ मी अश्या प्रकारे घेतो कीं, आत्म्याच्या शस्त्रसामग्रीमधील एक शस्त्र ज्याचा उपयोग आपण ठार मारण्यासाठीं केला पाहिजे तें शस्त्र म्हणजे “तलवार‘, जे “देवाचे वचन होय” (इफिस 6:17 ).

तर मग, जेव्हां आपले शरीर एखाद्या भयामुळे किंवा मोहामुळे पाप करण्यास प्रवृत्त होते तेव्हां आपण आत्म्याच्या तलवारीने त्या भयाला आणि त्या मोहाला मारून टाकायचे आहे. माझ्या अनुभवा नुसार, पाप ज्या गोष्टीचे अभिवचन देते आपण त्याचापेक्षा उच्च अभिवचनाद्वारें त्या अभिवचनाच्या मुळावर प्रहार करतो.

उदारणार्थ, जेव्हां मला निषिद्ध अश्या शारीरिक वासनेची लालसा होत असते, तेव्हां या पापाच्या आनंदाच्या मुळावर प्रहार करण्यासाठीं मी “आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय 5:8),  या वचनाचा वापर तलवारी प्रमाणे करतो. शुद्ध अंतकरणाने देवाला पाहण्याचा जो आनंद आहे त्याचें मी स्मरण करतो, आणि पापाच्या क्षणिक, उथळ आणि पीडा देणार्‍या परिणामांची आठवण ठेवतो, आणि त्याच्याद्वारें देव मला पापाच्या मोहावर विजय मिळविण्यांस सहाय्य करतो.

पापासोबत यशस्वीरित्या युद्ध करण्याकरिता, येणार्‍या मोहांवर विजय मिळवण्यासाठीं त्या क्षणाला लागू पडतील अशी देवाची अभिवचनें हाताशी असणें हे एक महत्वाचे शस्त्र आहे.

तथापि, असेहि प्रसंग असतांत जेव्हां आपल्यांला त्या प्रसंगाशी संबंधित अशी वचनें आठवत नाहींत. आणि पवित्र शास्त्रामधून आपल्यांकरिता अनुरूप असे वचन बघण्यासाठीं वेळ नसतो. अश्या वेळेला त्या भयाला किंवा मोहाला बळी पडून भरकटण्यापासून वाचण्यासाठीं आपल्यां मनाच्या भांडारात देवाच्या वचनांची सर्वसाधारण माहिती तयार असने गरजेचे आहे.

खाली ती चार अभिवचनें आहेत ज्यांचा पापाविरुद्ध लढा देण्यासाठीं मी सर्वाधिक उपयोग केलेंला आहें :

यशया 41:10, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्यां नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”

फिलिप्पैकरांस 4:19, “माझा देव आपल्यां संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारें पुरवील.”

आणि फिलिप्पैकरांस 3:8 मधील स्पष्ट अभिवचन, “तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो.”

आणि अर्थातच, मत्तय 5:8, “जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”

आपल्यां ज्ञानाच्या भांडारात सतत देवाच्या अभिवचनांची भर टाकींत जा. पण तुमच्या जीवनात देवानें आशीर्वादित केलेलीं जी मोजकीं अभिवचनें आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका. दोन्हीकडें लक्ष्य ठेवा. जुन्या अभिवचनांनिशी सदैव तयार असा. आणि प्रत्येक पहाटे नव्या दिवसाला सामोरे जाण्याकरीता नवीन अभिवचनांचा शोध करा.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *