ख्रिस्तानें आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. (1 योहान 3:16)
ख्रिस्त आम्हांसाठीं मेला यांत त्याचे दु:ख जितके हेतुपुरस्सर होते तितकींच आपल्यावरील त्याची प्रीती देखील जाणीवपूर्वक होती. आपलें जीवन देण्यामागे जर तो हेतुपुरस्सर होता तर ते बलिदान आम्हांसाठीं होते. ते त्याचे प्रेम होते.
“येशूनें आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकींयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्यानें शेवटपर्यंत केले” (योहान 13:1).
कॅलवरीकडे जाणाऱ्या मार्गावरील त्याच्या प्रत्येक पावलाचा अर्थ हांच कीं “मीं तुझ्यावर प्रीती केलीं आहे.”
म्हणून, त्यानें आम्हांसाठीं स्वतःचे जीवन दिले यांत ख्रिस्ताची प्रीती अनुभवण्यासाठीं, त्याचे तें मरण कसें पूर्णपणे हेतुपुरस्सर होते हे समजणे सहज जातें.
जेव्हां पेत्राने आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचे डोके उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ त्याचा कान छाटू शकला, तेव्हां त्या हिंसक प्रसंगानंतर येशूनें काय म्हटलें ते पहा.
तेव्हां येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय कीं, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झालें तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” (मत्तय 26:52 54)
हे सांगणे एक गोष्ट आहे कीं जुन्या करारात येशूच्या मृत्यूची तपशीलवार भविष्यवाणी केलीं गेलीं होती, असें म्हणणे एक गोष्ट आहे. पण तें सर्व शास्त्रलेख पूर्ण व्हावेत ह्याची खात्री करून घेण्यासाठीं येशू स्वतः ते सर्व निर्णय अगदी अचूकपणे घेत होता असे म्हणणे पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
मत्तय 26:54 मध्ये येशू आम्हांला तेच करित असल्याचे सांगत आहे. “मी हे संकट टाळू शकतो. पण असे झालें तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्वतःची सुटका करून घेण्यासाठीं मी जे पाऊल उचलू शकलों असतो ते मी उचलत नाहीये, कारण मला शास्त्रलेख ठाऊक आहेत. माझ्या लोकांचे तारण होण्यासाठींजें जें होणे अवश्य आहे हे मला ठाऊक आहे. देवाच्या वचनात माझ्याबद्दल जे भाकींत केले आहे ते सर्व पूर्ण करणे हा माझा निर्णय आहे. स्वकींयांवर मोठी प्रीती करणे— त्यां मार्गावरील प्रत्येक पाऊल उचलणें— हा माझा निर्णय आहे. आणि त्यांनी ही प्रीती अनुभवाने जाणून घ्यावीं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांनी पूर्णपणे सुरक्षित व स्वतंत्र, वा तसेंच ह्या जगापासून पूर्णपणे वेगळे केलेलें असें लोग व्हावें.
Great