जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. (स्तोत्र 1:3)
स्तोत्र 1:3 मधील हे अभिवचन कशा प्रकारे ख्रिस्ताकडे इशारा करते?
अभिवचन असें म्हणते, “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” नीतिमान लोक जे काही हाती घेतांत ते सर्व सिद्धीस जाते. हा अति भाबडेपणा आहे, कीं निर्विवाद सत्य?
आपल्याला ह्या जीवनांत दुष्टांची नक्कीच भरभराट होतांना दिसून येते कीं. “जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस!” (स्तोत्र 37:7). “….. दुराचारी संपन्न झालें आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे” (मलाकी 3:15).
तर नीतिमानांना मात्र ह्या जीवनात पुष्कळ संकटांतून जावें लागते आणि त्यांच्या चांगुलपणाचे प्रतिफळ त्यांच्याशी गैरवर्तन करून दिले जाते. “जर आम्हीं आपल्या देवाचे नाव विसरलो असतो….., तर देवानें हे शोधून काढले नसते काय? तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात” (स्तोत्र 44:20-22). स्वतः स्तोत्रकर्त्यांना याची जाणीव होती. आम्हीं एखाद्या अशा गोष्टी विरोधांत आरडाओरडा करित नाहींये ज्या विषयीं त्यांना पूर्वीपासून कल्पना नव्हती.
यास्तव, जेव्हां स्तोत्रकर्ता म्हणतो, “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते,” तो त्याचा अति भाबडेपणा नाही. तर ज्यां गोष्टी त्याला ह्या जीवनांत अंधुक दिसून येतांत त्याद्वारे तो मृत्यूनंतरच्या जीवनाकडे इशारा करतो, जिथे आपण केलेल्या सर्व गोष्टींचे खरे प्रतिफळ – म्हणजे खरी समृद्धी प्रकट केलीं जाईल.
पौलाची विचारसरणी हींच होती.
प्रथम, तो मृत्यूवर ख्रिस्ताच्या विजयाचे स्तुतीगान करतो. “अरे मरणा, तुझी नांगी कोठे?’ . . जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो” (1 करिंथ 15:55, 57).
मग, तो असा अर्थ काढतो कीं, या विजयामुळेच, विश्वासनाऱ्यानी केलेले प्रत्येक श्रम सिद्धीस जाईल. “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्हीं जाणून आहात” (1 करिंथ 15:58). जेव्हां एखादी गोष्ट व्यर्थ जात नाहीं, म्हणजेच ती सिद्धीस जाते.
ज्यां अर्थी ख्रिस्त आमचा प्रतिस्थापक म्हणून मरण पावला म्हणून, त्यां अर्थी त्यानें या गोष्टीची खात्री दिली कीं शेवटी प्रत्येक सत्कृत्य सिद्धीस जाईल. “प्रत्येक जण…… जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल” (इफिस 6:8). “जेव्हां लोक तुमची निंदा करतील तेव्हां तुम्हीं धन्य. . . . आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” (मॅथ्यू 5:11-12). येथें निंदा केलीं. स्वर्गांत प्रतिफळ मिळेल.
जुन्या करारात जी गोष्ट अति भाबळेपणाची वाटते (“जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते”) ती ख्रिस्ताच्या कार्याकडे आणि पुनरुत्थानाच्या निर्विवाद सत्याकडे इशारा करते. कॅथरीना फॉन श्लेगेलच्या त्या महान भजनातील शब्दांप्रमाणे, “हें माझ्या जीवा, शांत बैस, हें माझ्या जीवा शांत बैस: तु तुझ्या येशूकडून भरून पावशील / तो सर्व आपल्या पूर्णत्वांतून देतो.”