
“ख्रिस्तात सर्वाना सलाम, आपल्या Don’t Waste Your Life (तुमचे आयुष्य वाया घालवू नका!) या पुस्तकावर आधारित आपल्या पहिल्या पोडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या पोडकास्टमध्ये आपण एक महत्वाचा संदेश घेऊन येत आहोत – जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि आपण त्याचा उपयोग योग्य रीतीने कसा करू शकतो. जॉन पायपर यांच्या या पुस्तकामध्ये जीवनाच्या मूल्याच्या, परमेश्वराच्या महिम्याच्या आणि आपल्याला दिलेल्या वेळेचा कसा सदुपयोग करावा यावर विचारमंथन केले आहे. चला तर, आपल्या जीवनाला काहीतरी अर्थपूर्ण बनवूया आणि त्याचा खरा उपयोग कसा करावा हे जाणून घेऊया.
आपल्या विचारांना आकार देण्यासाठी आणि आपल्या जीवनाचे खरे उद्दिष्ट शोधण्यासाठी हा पोडकास्ट आपल्याला मार्गदर्शन करेल. आपली आणि आपल्यासोबत असलेल्या या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आपल्या पहिल्या एपिसोडसह होईल.
आणखी एक आनंदाची गोष्ट! Don’t Waste Your Life हे पुस्तक आता मराठीत उपलब्ध आहे. आपली प्रत खरेदी करण्यासाठी कृपया www.alethiabooks.com या वेबसाईटला भेट द्या.”