मी पीडित होण्यापूर्वी भटकत असें, पण आतां मी तुझें वचन पाळत आहे. (स्तोत्र 119:67)
हें वचन प्रकट करते कीं देव आपल्याला दुःख देतो ते हेतूनें कीं आपण त्याचे वचन पाळण्यांस शिकावे. हा हेतू कसा सिद्धीस जातो? दुःख आपल्याला देवाचे वचन शिकण्यास आणि त्याचे पालन करण्यास कसे उपयुक्त ठरते?
आम्हांवर होत असलेल्यां या महान दयेचे असंख्य अनुभव असल्या कारणानें या प्रश्नांची असंख्य उत्तरे आहेत. परंतु खाली पाच उत्तरं आहेत:
1. दु:ख आमच्यांत असलेली जीवनाविषयीची चंचल वृत्ती किंवा मानसिकता दूर करते आणि आपल्याला जीवनाविषयी अधिक गंभीर बनवते, म्हणजे आपल्या मनाचा कल देवाचे वचन जितके गंभीर आहे तितका त्यां गांभीर्याशी अधिक सुसंगत बनतो. आणि हें लक्ष्यांत ठेवा: देवाच्या पुस्तकात एकही पान चंचल वृत्तीचे नाहीं.
2. दु:ख आपले सर्व जगिक आधार काढून टाकते व आपण देवावर अधिक आणि अधिक विसंबून राहावे यासाठीं भाग पाडते, ज्यामुळें आपण त्याच्या वचनाशी समरूप व्हावें हा त्याचा उद्देश सिद्धींस जातो. कारण आपण देवावर आशा ठेवणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे असावे हांच त्याच्या वचनाचा उद्देश आहे. “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणांस शिक्षण मिळण्याकरितां लिहिलें यासाठीं कीं शास्त्रापासून मिळणार्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावीं” (रोमकरांस 15:4). “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्हीं विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत” (योहान 20:31).
3. दु:ख आपल्याला हाताशेवत पवित्र शास्त्रांत शोध घ्यावयांस अधिक उत्कंठीत करते कारण आपण दु:खाला जीवनाशी जुळलेली किरकोळ गोष्टीं मानण्याऐवजी त्याचे समाधान शोधतो. “तुम्हीं मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हां मी तुम्हांला पावेन” (यिर्मया 29:13).
4. दु:ख आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खाचे सहभागी बनविते, ज्यामुळें आपण त्याच्याशी अधिक घनिष्ठ सहभागी ठेवतो आणि या जगाची नश्वरता त्याच्या दृष्टिने अधिक सहजपणें पाहू शकतो. पौलाच्या मनाची उत्कंठा हीं होती कीं त्यानें “तो (ख्रिस्त) व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन ओळख करून घ्यावी” (फिलिप्पैकरांस 3:10).
5. दु:ख फसव्या आणि विचलित करणाऱ्या देहाच्या वासनांना जिवे मारते व आपल्याला अधिकाधिक आध्यात्मिक मार्गनुसारी बनविते व आपल्याला देवाचे आध्यात्मिक वचन ग्रहण करणारें असें लोक बनवते. “ख्रिस्तानें देहाने दुःख सोसले तसेच तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे” (1 पेत्र 4:1). दुःखामध्यें पापाला जिवे मारण्याची शक्ती असते. आणि आपण जितके शुद्ध होत जातो तितकेच आपण देवाला अधिक स्पष्टपणे पाहण्यांस समर्थ होत जातो (मत्तय 5:8).
दु:खाद्वारें देव आम्हांला जें शिक्षण देऊं पाहतो त्याचा आपण द्वेष करूं नये अशी पवित्र आत्मा आम्हांस कृपा पुरवो.