“आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.” (लूक 11:4)
मुळांत कोण कोणाला आधी क्षमा करतो?
- एकीकडे, येशू म्हणतो, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.” (लूक 11:4)
- तर दुसरीकडे, पौल म्हणतो, “प्रभूने तुम्हांला क्षमा केलीं तशी तुम्हींहि करा.” (कलस्सैकर 3:13)
जेव्हां येशू आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकवतो कीं देवानें आम्हांला आमच्या पापांची क्षमा करावी “कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो,” तेव्हां त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा नाहीं कीं क्षमा करण्याचे पहिले पाऊल आम्हीं उचललें होतें. या उलट, अर्थ असा आहे: आम्हीं ख्रिस्तावर पहिल्यांदा विश्वास ठेवला त्यावेळीच देवानें आम्हांला क्षमा केलीं (प्रेषितांची कृत्ये 10:43). मग, या भग्न झालेल्यां, आनंदी, कृतज्ञ, आमचीहि क्षमा करण्यांत आली या आशादायक अनुभवातून, आपणहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.
ही क्षमाशील भावना असें ठळकपणे प्रकट करते कीं आपल्याला क्षमा करण्यात आली आहे जिचे फळ तारण आहे. म्हणजे, जेव्हां आम्हीं एकमेकांना क्षमा करतो तेव्हां आपल्याठायीं विश्वास असल्याचे दिसून येते; आपण ख्रिस्ताबरोंबर एकरूप झालों आहों; आमच्याठायीं दया करणारा व आम्हांला दीन अंत:करण देणारा पवित्र आत्मा वसतो.
तरी आपण वेळोवेळी पाप करतो (1 योहान 1:8, 10). म्हणून आपण वेळोवेळी ख्रिस्तानें आमच्यासाठीं केलेल्यां प्रायश्चित्ताची नव्याने आठवण ठेऊन देवाकडे वळतो – म्हणजे पुन्हा एकदा पापांची क्षमा मागतो. जर आम्हांमध्यें एकमेकांना क्षमा करणारा आत्मा वस्ती करित नसेल तर आपणहि त्याच्याकडे क्षमायाचनेची मजल मारूं शकत नाही. (मत्तय18:23-35 मधील कृतघ्न (क्षमा न करणाऱ्या) चाकराचा दाखला लक्षात ठेवा. त्याला आपले एक कोटी रुपयाचे देणें माफ केलें गेलें, तरी देखील त्यानें मात्र आपल्या सोबतीच्या दासाला पंचवीस रुपयाचे येणें माफ करण्यांस नकार दिला. त्यानें आपल्या कृतघ्न आत्म्याद्वारें दाखवून दिलें कीं राजानें त्याच्यावर केलेल्या दयेचा त्याच्यावर कांहीहि प्रभाव पडला नव्हता.)
या मूर्खपणापासून आम्हांला वाचविण्यासाठीं येशूनें आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकविलें कीं, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो” (लूक 11:4). म्हणून येशू म्हणतो कीं आम्हीं यासाठीं क्षमा मागतो कारण आम्हींहि क्षमाशील आहों. हे जणूं असे म्हणणें आहे कीं, ” हे पित्या, ख्रिस्तानें जी दया माझ्यासाठीं विकत घेतलीं आहे ती माझ्यावर कायमस्वरूपी असूं दें, कारण या दयेमुळेंच मला माझे अपराध क्षमा केलें गेलें आहेंत, आणि मी सूड घेणे सोडले आहे, आणि जशी तू माझ्यावर दया केलीं आहेस तशी मीहि इतरांना दया करीन.”
देव करो कीं, देवाची क्षमा काय आहे हें तुम्हीं आज पुन्हा नव्याने जाणून घ्यावें आणि देव करो कीं तुम्हीं एकमेकांना क्षमा करून तुमच्या अंत:करणांत असलेली दया ओसंडून वाहावी. आणि तुमच्या जीवनातील कृपेचा तो गोड अनुभव तुम्हाला तुमच्या तारणाची आणखी खात्री देवो, म्हणजे असें कीं जेव्हां तुम्हीं रक्तानें विकत घेतलेल्या क्षमेचा नव्याने अनुभव घेण्यासाठीं देवाकडे जाल, तेव्हां तुम्हीं जाणून घ्यावें कीं तो तुम्हांकडे स्वतःची एक अशी संतती म्हणून पाहतो जिच्या पापांची क्षमा झाली आहे व जी स्वतःहि इतरांना त्यांचे अपराध क्षमा करते.