29 जानेवारी : आम्हांला परत वळविलें

Alethia4India
Alethia4India
29 जानेवारी : आम्हांला परत वळविलें
Loading
/

हे परमेश्वरा, तू आम्हांला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्हीं वळू. (विलाप 5:21, माझे भाषांतर)

जोपर्यंत देव स्वतः आपल्या लोकांना त्यांचे पाप व अविश्वासामुळें उद्भवणाऱ्या धर्मत्यागापासून आपणांकडे परत वळवित नाहीं तोपर्यंत देवाच्या लोकांसाठीं कोणतीही आशा नाहीं.

विलापगीताचे पुस्तक हे बायबलमधील असे पुस्तक आहे जें सर्वात उदासीपूर्ण अशा विचारांनी भरलेलें पुस्तक आहे. देवानें स्वत: त्याच्या डोळ्याच्या बाहुलीला, म्हणजे यरुशलेमेला ओसाड केलें होते.

  • परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्यानें आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्यानें सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत. (विलाप 4:11)
  • दृष्टीस रम्य असे सर्व त्यानें मारून टाकले आहेत. (विलाप 2:4)
  • तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे. (विलाप 1:5)

तर मग पुस्तकाचा शेवट कसा होतो?

यां पुस्तकाचा शेवट फक्त एकाच आशेनें होतो:

हे परमेश्वरा, तू आम्हांला तुझ्याकडे परत वळव, म्हणजे आम्हीं वळू. (विलाप 5:21)

माझ्यासाठीं हींच एकमेव आशा आहे – आणि तुमच्यासाठीं सुद्धा हींच एकमेव आशा आहे!

येशू पेत्राला म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32).

‘जर  तू वळलास तरच’  असें तो म्हणत नाहीं. पण तू वळलास म्हणजे. कारण मी तुझ्यासाठीं विनंती केलीं आहे, कीं तू परत वळावे. आणि जेव्हा तू वळतोस तेव्हा ही कृती माझ्या सार्वभौम कृपाचे कार्य असेल जी तुला धर्मत्यागाच्या कचाट्यातून परत घेऊन येईल.

ख्रिस्ती बंधू, हे तुमच्याबाबतींत सत्य आहे. विश्वासात टिकून राहण्यासाठीं हींच तुमची एकमेव आशा आहे. ह्याची प्रौढी मिरवा.

जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. (रोमकरांस 8:34)

तोच आम्हांला स्वतःकडे परत वळविल. म्हणून, “तुम्हांला पतनापासून राखण्यास जो समर्थ आहे…….अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत” (यहूदा 1:24-25). आमेन!

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *