22 जानेवारी : आम्हीं सर्व गोष्टींवर राज्य करूं

Alethia4India
Alethia4India
22 जानेवारी : आम्हीं सर्व गोष्टींवर राज्य करूं
Loading
/

मीं जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलों, तसा जो विजय मिळवितो त्याला मीं आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसूं देईन.” (प्रकटीकरण 3:21)

जेव्हां येशूलावदिकीया येथील ख्रिस्ती मंडळीलाअसें म्हणतो तेव्हां त्याला काय म्हणायचें आहे?

म्हणजे येशूबरोबर त्याच्या राजासनावर बसणें? खरंच?

हें अभिवचन जो विजय मिळवितो त्यां प्रत्येकासाठीं आहे, म्हणजेच अशा व्यक्तीसाठीं जो वेदना आणि वासनेनें भरलेल्या पापाच्या आनंदाला न जुमानता, शेवटपर्यंत टिकून राहून विश्वासाची धाव  धावतो (1 योहान 5:4). यास्तव जर तुम्हीं येशूवर खरा विश्वास ठेवणारी व्यक्ती असाल तर मग जो देव पित्याच्या राजासनावर बसला आहे त्यां देवाच्या पुत्राच्या सिंहासनावर तुम्हीं देखील बसाल.

मला या विश्वावर राज्य करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य देण्यांत आले आहे हें दाखवण्यासाठीं मी “देवाच्या राजासनावर” बसतो. तिथेच येशू बसला आहे. पौल म्हणतों “आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केलें पाहिजे.” (1 करिंथकरांस 15:25). म्हणून जेव्हां येशू म्हणतो, “त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसूं देईन,” तेव्हां आम्हांला सुद्धा सर्व गोष्टींवर राज्य करण्याचा तो स्वतःबरोबर अधिकार देईल असें अभिवचन तो आपल्याला देतो.

इफिसकरांस 1:22-23 मध्ये जेव्हां पौल असें म्हणतो “त्यानें सर्वकांही [ख्रिस्ताच्या]  पायांखाली ठेविलें, आणि त्यानें सर्वांवर मस्तक असें व्हावें म्हणून त्यांस मंडळीला दिलें; हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकांही भरतो त्यानें ती भरलेलीं आहे” तेव्हां त्याच्या मनात हींच गोष्ट आहे का?

आपण, जी त्यांची मंडळी, “जो सर्वांनी सर्वकांही भरतो त्यानें भरलेलें ” आहों. म्हणजे काय? मी याचा अर्थ असा समजतो कीं हें संपूर्ण विश्व प्रभूच्या महिम्यानें भरलें जाईल (गणना 14:21). आणि त्या महिम्याची एक बाजू ही कीं त्याच्या राज्याचा विस्तार सगळीकडे आणि बिनविरोध होईल.

म्हणून, इफिस 1:23 चा अर्थ असा होईल: येशू आमच्याद्वारें  त्याच्या स्वतःच्या गौरवशाली राज्यानें संपूर्ण विश्व भरतो. त्याच्याबरोबर त्याच्या राज्याचें सह-वारसदार झाल्यामुळें, आपण त्याच्या राज्यानेंभरलेलें आहों. आपण त्याच्या वतीनें, त्याच्या सामर्थ्यानें, त्याच्या अधिकाराखाली राज्य करतो. त्या दृष्टीनें आपण त्याच्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलेलें आहों.

हें सत्य आपल्याला जसें समजणें गरजेचे आहे तसें हें आपल्यापैकी कोणीच समजत नाही. ती आपल्या कल्पनेपलीकडची गोष्ट आहे — अति उत्तम, अति आश्चर्यकारक. म्हणूनच देवानें सहाय्य करावें अशी पौल प्रार्थना करतो, कीं  “तुमचें अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळें निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्यानें दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी….हे तुम्हीं ओळखून घ्यावें” (इफिस 1:18).

तर मग, आताच सर्वशक्तिमान देवानें आपले सहाय्य केल्यांवाचून, आपण जे बनणार आहों त्या गोष्टीची नवलाई आपण समजू शकत नाही. परंतु जर त्यानें आपल्याला ते समजू दिलें, जसे कीं ते प्रत्यक्षांत आहे, तर या जगांत असलेल्या सर्व गोष्टींना आपण ज्यां भावावेशाने प्रतिक्रिया देतो तिचे स्वरूप बदलून जाईल. नवीन कराराच्या विचित्र आणि मूळ आज्ञा जशा आपल्याला यापूर्वी विचित्र वाटत होत्या तशा यापुढें वाटणार नाहींत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *