19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी

Alethia4India
Alethia4India
19 जानेवारी: दुष्ट धन्याची सेवा कशी करावी
Loading
/

ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असें मानून ती सद्भावानें करा; कारण तुम्हांला माहीत आहे कीं, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल. (इफिस 6:7-8)

तुमच्या नोकरीशी संबंधित इफिसकरांस 6:7-8 मधील पुढील पाच गोष्टींचा विचार करा.

1) मुळांत प्रभु-केंद्रित जीवन जगण्यासाठीं पाचारण.

आपण सामन्यपणें ज्या पद्धतीनें जगतो ती लक्षांत घेतां आमच्या मूळ पाचारणाचा हा विषय थक्क करणारा आहे. पौल म्हणतो कीं आपण आपली सर्व चाकरी आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या कोणा मनुष्यासाठीं नव्हें, तर ख्रिस्ताची चाकरी करित आहों असें मानून ती करावीं : माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा.

याचा अर्थ असा कीं, आपण आपल्या नौकरीच्या ठिकाणी जें कांही काम करितो तें आपण आपल्या प्रभूचा विचार करूनच करणार. आपण स्वतःला प्रश्न विचारूं कीं, प्रभूला हे काम माझ्यांकडून का  करून घ्यावयाचे आहे? हे काम मीं कसें  करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे काम मीं केव्हां  पूर्ण करावें म्हणून प्रभूची इच्छा आहे? हे पूर्ण करण्यांस प्रभू मला सहाय्य पुरवेल का? यां कामामुळें  प्रभूचा कसा आदर होईल? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ख्रिस्ती असणें म्हणजे आमचे जगणें व नौकरी/कामधंदा करणें ह्यांत पूर्णपणें प्रभु-केंद्रित असणें.

2) उत्तम व्यक्ती होण्यासाठीं पाचारण.

प्रभु-केंद्रित जगणें म्हणजे उत्तम व्यक्ती बनणें आणि ज्यां कांही गोष्टीं चांगल्या आहेत त्यांच करणें. पौल म्हणतो, प्रत्येक जण जें काही चांगले [चाकरी] रितो” तें “सद्भावानें करा. येशूनें म्हटलें कीं जेव्हां आपण आपला प्रकाश लोकांसमोर पडू देतो, लोक आपली “सत्कृत्यें” पाहून आपल्या स्वर्गातील पित्याचा गौरव करतील (मत्तय 5:16).

3) आपल्या देहदशेंतील पाषाणहृदयी धन्यांसाठीं चांगले काम करण्यांस बळ.

ख्रिस्ती दासांना आपल्या पाषाणहृदयी धन्यांसाठीं, प्रभु-केंद्रित राहूनच, चांगले काम करित राहावें यांसाठीं सबळ बनविणें हा पौलाचा हेतूं आहे. जेव्हां तुमचा बॉस  तुमच्याकडे सतत दुर्लक्ष करतो किंवा तुमच्या कामासंबंधाने तुमची टीका करित राहतो, त्यावेळीं सुद्धा तुम्हीं तुमचें काम उत्तमपणें कसे चालू ठेवतां? पौलाचे उत्तर आहे: तुमचा बॉस हांच तुमचा मुख्य धनी आहे असा विचार करणें थांबवा आणि यांपुढें ते काम प्रभूचे आहे असें मानून करा. हींच चित्तवृत्ती ठेऊन तुमच्या देहदशेंतील धन्यानें जें काम तुम्हांला सोपविलें आहे त्यांत आपलें कर्तव्य पूर्ण करा.

4) उत्तेजन कीं तुम्हीं केलेलें कोणतेहि चांगले काम वाया जात नाहीं.

या शास्त्र-पाठांत असलेलें सर्वांत अद्भुत शब्द कदाचित हें आहेत : “प्रत्येक जण…… जें कांही चांगले करितो, तेंच तो प्रभूकडून भरून पावेल.” ही बाब अद्भुत आहे. जें काही! “प्रत्येक जण.. जे कांही चांगलं करितो तेंच.” तुम्हीं केलेल्या प्रत्येक छोट्यां चांगल्या कामाकडे प्रभू लक्ष्य ठेवतो, आणि तें तो मूल्यवान समजतो, आणि त्याचे प्रतिफळ देतो.

आणि तुम्हीं त्याच्याकडून पूर्णपणे भरून पावाल. तुम्हीं कांहीतरी कमावलें आहे या अर्थाने नव्हें — जणू कांही तुम्हीं त्याला आपला ऋणी बनवू शकता. तो तुमचा आणि यां विश्वातील प्रत्येक गोष्टीचा धनी आहे. तो कोणत्याहि गोष्टीसाठीं आमचा ऋणी नाहीं. परंतु विश्वासानें केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी तो स्वेच्छेनें व कृपेनें आपल्याला प्रतिफळ देण्याचे ठरवितो.

5) प्रोत्साहन कीं पृथ्वीवरील क्षुल्लक काम सुद्धा स्वर्गातील महान प्रतिफळ मिळवून द्यावयांस अडथळा नाहीं.

तुम्हीं केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे प्रतिफळ प्रभू स्वतः देईल – “मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो.” तुमचा बॉस कदाचित असा विचार करील कीं तुम्हीं कोणीही नाहीं —नावाला, फक्त एक दास. किंवा तुम्हीं तिथें काम करित आहां हे सुद्धा त्याला कदाचित ठाऊक नसेल. पण त्यानें काही फरक पडत नाहीं. तुम्हीं तिथें काम करता हे प्रभूला ठाऊक आहे. आणि सरतेशेवटी, विश्वासूपणें केलेलीं कोणतीही चाकरी व्यर्थ जाणार नाहीं.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *