मग मृत झालेल्या लहानथोरांना मीं [देवाच्या] राजासनापुढे उभें राहिलेलें पाहिलें. त्या वेळी ‘पुस्तकें उघडलीं गेलीं;’ तेव्हां दुसरे एक ‘पुस्तक’ उघडलें गेलें तें ‘जीवनाचें’ होतें; आणि त्या पुस्तकांमध्यें जें लिहिलें होतें त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणें’ ठरविण्यांत आला. (प्रकटीकरण 20:12)
शेवटचा न्यायनिवाडा कसा केला जाईल? आपल्या पापांचे स्मरण केलें जाईल का? तीं उघडकीस आणली जातील का? अँथनी होकेमा या प्रश्नाचें उत्तर पुढील शब्दांत सुज्ञपणे मांडतात: “न्यायाच्या दिवशी विश्वासणाऱ्यांची पापें आणि त्यांच्या उणीवां विचारांत घेतली जातील. परंतु — आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे — विश्वासणाऱ्यांची पापें आणि उणीवां न्यायाच्या वेळीं अशा पापांच्या स्वरूपांत प्रकट केलीं जातील ज्यांची क्षमा झालेलीं आहें, ज्यांचे अपराध येशू ख्रिस्ताच्या रक्तानें पूर्णपणें झाकलें गेलें आहेत.”
त्या घटनेचें तुमच्या डोळ्यांसमोर असें चित्र उभे करा. देवाकडे प्रत्येक व्यक्तीची एक फाइल, म्हणजे नोंदणीचे एक कायदेशीर दस्तऐवज आहे (प्रकटीकरण 20:12 मधील “पुस्तके”). तुम्हीं जे कांही केलें आहे किंवा जो जो व्यर्थ शब्द बोललांत (मत्तय 12:36) त्यां सर्वांची त्यांत (“A” पासून “F” पर्यंत) ज्यांच्या-त्यांच्याग्रेड, म्हणजे पातळीसह नोंद केलेलीं आहे. जेव्हां तुम्हीं “ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर” उभे केलें जाल (२ करिंथ 5:10) “ह्यासाठीं कीं (तुम्हीं) देहानें केलेल्या गोष्टीचें फळ (तुम्हांला) मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो” तेव्हां देव ती फाइल उघडेल आणि तुम्हीं केलेल्या कर्मांची त्यांच्या (ग्रेड) पातळीसह चाचण्यांची मांडणी करेल. त्यांत असलेले सर्व “F” ग्रेड तो बाहेर काढेल आणि त्यांचा एक ढीग लावेल. मग तो सर्व “D” ग्रेड आणि सर्व “C” ग्रेड घेईल आणि ह्या चाचण्यांचे सर्व निकाल बाहेर काढून त्यांना “A” ग्रेड बरोबर ठेवेल, आणि जें जें निकाल वाईट असतील तें सर्व तो “F” ग्रेड मध्यें टाकेल. मग तो सर्व “B” ग्रेड आणि “A” ग्रेड घेईल आणि त्यांतील सर्व वाईट निकाल बाहेर काढेल आणि “F” च्या ढिगाऱ्यांत टाकून देईल आणि सर्व चांगले निकाल “A” ग्रेड च्या ढिगाऱ्यांत टाकून देईल.
मग तो दुसरी फाईल (“जीवनाचे पुस्तक”) उघडेल आणि त्यांत तुमचे नाव शोधेल, कारण तुम्हीं विश्वासाद्वारें ख्रिस्तामध्यें आहांत. तुमच्या नावामागें येशूच्या वधस्तंभापासून बनवलेलीं एक लाकडी आगकाडी असेल. तो ती आगकाडी घेऊन पेटवेल आणि तुमची सर्व पापें आणि उणीवांचा लावलेला “F” ग्रेड चा ढीग पेटवून तो जाळून टाकेल. त्यांचा दोषी तुमच्यांवर लावण्यांत येणार नाहीं आणि तुम्हांला त्यांचे प्रतिफळहि मिळणार नाहीं.
मग तो तुमच्या “जीवनाच्या पुस्तकांतून” एक मोहरबंद लिफाफा घेईल ज्यांवर “विनामूल्य आणि कृपेचे लाभांश : जीवन!” असें चिन्ह असेल आणि तो लिफाफा घेऊन “A” ग्रेडच्या ढिगाऱ्यांवर ठेवेल (मार्क 4:24 आणि लूक 6:38 पहा). मग तो संपूर्ण ढीग उचलून धरेल आणि अशी घोषणा करेल, “यांद्वारें तुमचें जीवन माझ्या पित्याच्या कृपेची, माझ्या रक्ताच्या मोलाची आणि माझ्या आत्म्याच्या फळाची साक्ष देतें. ही साक्ष देतांत कीं तुमचें जीवन सार्वकालिक आहे. आणि यांनुसार तुम्हांला आप-आपली प्रतिफळें मिळतील. आपल्या धन्याच्या सार्वकालिक आनंदांत सहभागी व्हां.”