ह्यावरून हें इच्छा बाळगणार्यावर नव्हे किंवा धावपळ करणार्यावर नव्हे, तर दया करणार्या देवावर अवलंबून आहे. (रोमकरांस 9:16)
वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपण हें स्पष्ट समजून घेऊया की येशूवर विश्वास ठेवणारें म्हणून या वर्षी देवाकडून आपल्याला जे काहीं मिळेल, तीं केवळ त्याची दया आहे. जे काही सुख किंवा जे काही दुःख आपल्या वाट्याला येतील तें सर्व दया करणार्या देवापासून असतील.
ख्रिस्त ह्याकरितां जगात आला: “असे की….परराष्ट्रीयांनीं त्याच्या दयेमुळें देवाचें गौरव करावें” (रोमकरांस 15:9). शिवाय, “त्यानें आपल्या महादयेनुसार आपल्याला पुन्हा जन्म दिला” (1 पेत्र 1:3). “आपल्यावर दया व्हावी” (इब्री 4:16) अशी आम्हीं रोज प्रार्थना करतो; आणि आता आपण “सार्वकालिक जीवनासाठीं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट” पाहत आहों (यहूदा 1:21). जर कोणी ख्रिस्ती मनुष्य विश्वासू असल्याचें सिद्ध करतो, तर तो ते “विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारें झाली आहे” म्हणून करतो (1 करिंथकर 7:25).
लूक 17:5-6 मध्ये, प्रेषित प्रभूला विनंती करतात, “आमचा विश्वास वाढवा!” तेव्हां येशू म्हणतो, “तुम्हांमध्यें मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रांत लाविली जा,’ असें तुम्हीं सांगताच ती तुमचें ऐकेल.” म्हणजें, आपल्या ख्रिस्ती जीवनांत आणि सेवेंत घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या विश्वासाच्या बळकटीमुळें किंवा परिमाणामुळें होत नाहींत, कारण झाडे मुळांसकट उपटून टाकणे हे त्यामुळें होत नाहीं. ते देव करतो. म्हणून, सर्वात कमी विश्वास जों खऱ्या अर्थाने आम्हांला ख्रिस्ताशी जोडतो तो विश्वास त्याच्या सामर्थ्याद्वारें आपल्यासाठीं गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टीं घडवून आणावयांस पुरेसा आहे.
पण ज्यां ज्यां प्रसंगी तुम्हीं यशस्वीपणें प्रभूची आज्ञा पाळता त्या त्या प्रसंगांचे काय? तुमचा आज्ञाधारकपणा तुम्हाला दयेसाठीं विनवणी करणाऱ्यांच्या श्रेणीतून बाहेर काढते का? लूक 17:7-10 च्या पुढील वचनांमध्ये येशू असें उत्तर देतो :
“तुम्हांपैकीं असा कोण आहे कीं, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरें राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आतांच येऊन जेवावयाला बैस.’ उलट ‘माझें जेवण तयार कर, माझें खाणेंपिणें होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तूं खा व पी,’ असें तो त्याला म्हणणार नाहीं काय? सांगितलेली कामें दासानें केलीं म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणें तुम्हांला सांगितलेली सर्व कामें केल्यावर आम्हीं निरुपयोगी दास आहों, आम्हीं आमचे कर्तव्य केलें आहे, असें म्हणा.”
यांवरून मीं असे मानतो कीं, पूर्ण आज्ञाधारकपणा आणि सर्वात कमी विश्वास यां दोन्हीं गोष्टीं देवाकडून एकच गोष्ट प्राप्त करून घेतांत : ती म्हणजें कृपा. फक्त मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास जरी असेल, तर तो झाड हलविणारीकृपा प्राप्त करून देण्याइतपत हितकारक ठरतो. आणि निष्कपट आज्ञाधारकपणा आपल्याला पूर्णपणे दयेवर विसंबून ठेवतो.
शेवटी मुख्य मुद्दा हा आहे : देवाच्या दयेचे निमित्त किंवा स्वरूप काहीही असो, दयेचे अपात्र लाभार्थी म्हणून आपली जी लायकी आहे, त्यापलीकडें आपण कधींच जात नाहीं. जी गोष्ट प्राप्त होण्यांस आपली पात्रता नाही त्यां गोष्टींसाठीं आपण नेहमी पूर्णपणे विसंबून राहतो.
ह्यास्तव या, आपण स्वतःला नम्र करूं, आणि आनंद करूं आणि “त्याच्या दयेमुळें देवाचें गौरव करूं!”