ज्याअर्थी माणसांना एकदांच मरणें व त्यानंतर न्याय होणें नेमून ठेवलें आहे, त्याअर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापें स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदांच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठीं तो दुसर्यांदा दिसेल. (इब्री 9:27-28).
येशूच्या मरणानें आमच्या पापांचा भार वाहून नेला. हा सिद्धांत ख्रिस्ती धर्माचे मर्म आहे, आणि सुवार्तेचा मुख्य विषय आहे आणि जगात देवानें मानवाच्या मुक्तीसाठीं केलेल्या महान कार्याचे मर्म आहे. ख्रिस्त मरण पावला तेव्हां त्यानें पापें स्वतःवर वाहून नेलीं. जीं पापें त्यानें वाहून नेलीं तीं त्याची स्वतःची पापें नव्हती. तर त्यानें इतरांनी केलेल्या पापांसाठी मरण सोसले, ह्यासाठीं कीं त्यांनी पापांपासून मुक्त व्हावें.
तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या अडचणीचे हेच समाधान आहे, मग तुम्हाला ती अडचण मोठी वाटत असों वा नसों. आपण पापी असतानांहि देवा बरोबर आपले नाते कसे पुनर्स्थापित होऊ शकतें या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि याचे उत्तर असें कीं ख्रिस्ताचा मृत्यू हा “पुष्कळांची पापें स्वतःवर घेण्यासाठीं” एकदांच केलेलें अर्पण आहे. त्यानें आमची पापें उचलून तीं वधस्तंभावर नेलीं आणि जे मरण आम्हीं मरावयास पात्र होतो त्या मरणानें तो तेथे मरण पावला. तर आता माझ्या मरणाशी ह्याचा काय संबंध आहे? “[माझ्यासाठी] एकदांच मरणें नेमून ठेवलें आहे.” म्हणजे आता माझे मरण हे माझ्यासाठीं पापदंडस्वरूपाचे नाही. यापुढे माझे मरण पापसंबंधात असलेला दंड नाही. माझे पाप वाहून दूर करण्यांत आलें आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूनें माझी “पापे नाहीशी” करण्यात आलीं आहेत. ख्रिस्तानें ती शिक्षा स्वतःवर घेतली.
मग मीं अजूनहि शरीराने का मरतो? कारण देवाची अशी इच्छा आहे की पापाच्या भयंकर भयावहतेची कायमस्वरूपी साक्ष म्हणून मरण सांप्रतकाळी जगामध्येच कायम असावें, आणि ते त्याच्या स्वतःच्या लेकरांमध्येहि कायम असावें. जेव्हां आम्हीं मरतो तेव्हां त्या मरणाद्वारे आपण ह्या जगात पापाचें आजहि कायम असलेलें बाह्य परिणाम प्रकट करतो.
पण देवाच्या मुलांसाठी हे ऐहिक मरण आता त्यांच्यावर असलेला त्याचा कोप नाही. तें मरण आता आम्हांसाठीं दंडाज्ञा नाही, तर आमच्या तारणाचे प्रवेशद्वार बनलें आहे.