कारण पवित्र होणार्यांना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहें. (इब्री 10:14)
हा शास्त्रलेख आपल्यांसारख्या अपूर्ण पाप्यांसाठीं उत्तेजनानें भरलेला आहे, आणि त्यांत पवित्र जीवनासाठीं विपुल प्रेरणा आहे.
म्हणजेंच तुम्हीं तुमच्या स्वर्गीय पित्याच्या दृष्टीनें पूर्ण आणि सिद्ध आहांत अशी खात्री तुम्हीं बाळगू शकता, पण तुम्हीं स्वतःमध्यें पूर्ण आहांत असें नाही, तर नेमके ह्यामुळें कीं तुम्हीं आता पूर्ण नसता “पवित्र केले जात आहांत “, “पवित्र बनविलें जात आहांत” – म्हणजें असें कीं, देवाच्या अभिवचनांवर विश्वासाद्वारें, तुम्हीं तुमच्या हेलकावणाऱ्या अपूर्णतेपासून अंशा- अंशानें वाढत जाणाऱ्या पवित्रतेकडें वाटचाल करित आहांत. हाच इब्री 10:14 चा प्रमुख मुद्दा आहे.
तुमचा विश्वास तुमच्यांत पापाचा त्याग करण्याची आणि पवित्रतेत अंशा-अंशानें प्रगती करण्याची उत्कंठा निर्माण करतो का? हा असा विश्वास आहे कीं जो अपूर्णतेच्या ढगाळ स्थितिंतहि ख्रिस्ताकडे पाहून म्हणूं शकतो, “तूं तर मला तुझ्या दृष्टीनें पूर्वींच पूर्ण केलें आहेस.”
हा विश्वास म्हणतो, “ख्रिस्ता, आज मीं पाप केलें आहें. पण मला माझ्या पापाचा वीट आला आहे. कारण तूं नियमशास्त्रातील आचार माझ्या अंत:करणात लिहिलें आहेस, म्हणून तें पाळण्याची मला उत्कंठा लागली आहें. आणि जें काहीं तुझ्या दृष्टीनें मान्य व आवडणारे आहे तें तूं माझ्यामध्यें साधून देत आहेस (इब्री 13:21). आणि म्हणून, जीं पापें अद्यापहि माझ्या हांतून होतांत त्यां पापांचा मला वीट आला आहें; इतकेंच नव्हें, तर मला माझ्या मनांत उद्भवणाऱ्या पापी विचारांचा सुद्धा वीट आला आहें.”
हाच तो खऱा आणि अस्सल विश्वास आहे ज्याद्वारें आम्हीं तारले जातो. हाच तो विश्वास आहे जो पुढील वचनांचा गोड आस्वाद घेऊं शकतो : “कारण पवित्र होणार्यांना त्यानें एकाच अर्पणानें सर्वकाळचें पूर्ण केलें आहें.” हा बलवानांचा गर्विष्ठपणा नाहीं. ही त्यां दुर्बळ पाप्यांची ओरड आहे ज्यांना तारणकर्त्याची गरज आहे.
मीं तुम्हांला हाक मारतो, तुम्हांला विनंती करतो कीं, इतके दुर्बळ व्हां कीं ख्रिस्तावर तुमचा असा विश्वास शोभून दिसला पाहिजें.