Article #1: देव माझ्यापासून लपलेला आहे काय?

Alethia4India
Alethia4India
Article #1: देव माझ्यापासून लपलेला आहे काय?
Loading
/

जेव्हां ख्रिस्ती विश्वासणारे त्याच्या अनुपस्थितीची जाणीव करतांत  

परंतु जेव्हां तुम्हाला त्याची अत्यंत निकडीची गरज भासते आणि इतर सर्व आधार निष्फळ ठरतात, तेव्हां तुम्हीं त्याच्याकडे वळता, पण तुमच्या निदर्शनास काय येते? तुमच्या तोंडावर दार जोरात बंद केल्याचे निदर्शनास येते आणि आतून ते दार अधिक घट्ट बंद करण्याचा आवाजही कानी पडतो. त्यानंतर तेथे भयाण शांतता पसरते. तसेच तुम्हाला असे वाटू शकते कीं, येथे थांबण्यात काहीही अर्थ उरलेला नाही, कारण तेथील भयाण शांतता तुम्हाला खायला उठते आणि हळूहळू ती अधिकच तीव्र होत जाते. घरामध्ये कोठेही दिवे जळत नसतात आणि ते घर रिकामे जाणवते आणि पुढे असाही विचार येतो कीं, खरोखर येथे कोणी राहत असेल का? एकेकाळी तेथे कोणीच राहत नसावे असा प्रबळ विचार मनात येतो. याचा काय अर्थ असू शकतो? आपल्या समृद्धीच्या काळात, तो आपल्याला अगदी निकटचा असतो आणि संकटसमयी जेव्हां आपल्याला त्याची गरज असते त्यावेळी मात्र तो फार दूरचा आहे, असे का वाटते? (अ ग्रीफ अबझर्व्ह, 6 / A Grief Observed,6)

सी. एस. लुईस ह्यांनी त्यांच्या पत्नी जॉय डेव्हिडमॅन हिच्या मृत्यूनंतर आलेल्या दु:खाचे वर्णन अशा शब्दांत केले. येथे लुईस अशा अनेक लोकांच्या अनुभवाचे वर्णन करतात ज्यांनी त्यांच्यासारखेच जीवनातील खऱ्या संकटांचा सामना करताना देवाचा शोध घेतला, पण त्यांना देवाची “अनुपस्थिती” जाणवली. ह्या अनुभवालाच कधी-कधी“दैवी अदृश्यतेची” समस्या असेही म्हटले जाते.

तर देवाची ही “अनुपस्थिती” जिचा अनुभव माझ्यासारख्या अनेक लोकांनी घेतला आहे, तिचे कारण काय असावे? आणि आपण त्याच्या अनुपस्थितीला कसें ओळखावें की जेणेकरून आपण पुन्हा त्याचा शोध घेऊं?

अनुपस्थितीची अपेक्षा करणें
देवाची अनुपस्थिती ह्या प्रश्नाला आपण दोन दृष्टिकोनातून पाहूया : प्रथम, “देवाची जिवंत-अनुपस्थिती” आणि दुसरे, देव आपल्या इंद्रियांना सहजरीत्या अवगत होत नाही, ही एक वास्तविकता आहे. तर चला, आपण एका वेळी  एकच बाजू समजून घेऊया.

अनेक लोकांच्या मते, देवाची अनुपस्थिती ही खूप खोलवर रुतलेली आहे. कारण ते त्यांच्या दैनंदिन जीवनात देवाचा विचार न करता किंवा त्याची उपस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न न करता जीवन जगत असतात. हे जरी विचित्र वाटत असले तरी, ह्या प्रकारची देवाची जिवंत-अनुपस्थिती ख्रिस्ती आणि गैर-ख्रिस्ती ह्या दोघांच्याही जीवनात दिसून येते. स्टीफन शार्नॉक ह्या चलनशक्तीला“व्यावहारिक नास्तिकता” असे संबोधतात (द इग्झिस्टंस अँड अॅट्रीब्यूट्स ऑफ गॉड 1:137–255/ The Existence and Attributes of God, 1:137–255). अनेक लोक, अगदी स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे देखील, अशाच प्रकारे जीवन जगतात, जणूकाही देव आहेच नाही! 

खरे पाहता, देवाच्या अनुपस्थितीची तीव्र भावना जीवनात असण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जीवनात अशी पापें असणे ज्यांचा अंगीकार केलेला नसतो, किंवा त्यांपासून पश्चात्ताप केलेला नसतो! शार्नॉक असे सूचित करतात कीं, पाप करणे म्हणजे गुप्तपणे देवाच्या अनुपस्थितीची इच्छा धरणे होय. यास्तव, आपण पापात अडकलेले असतांना आपल्याला देवाच्या अनुपस्थितीची तीव्र भावना जाणवणे, हे स्वाभाविकच आहे. ह्या दैवी अदृश्यतेच्या स्थितीवर योग्य उपाय म्हणजे पापाची कबुली देऊन देवाकडे परतणे हा आहे.

आधुनिक अस्तित्ववादाने देवाच्या जिवंत अनुपस्थितीच्या ह्या स्वरूपाला एक “तत्त्वज्ञानाचे” रूप दिले आहे. जॉन कर्टनी मरे हे “(द प्रॉब्लेम ऑफ गॉड, 117 / The Problem of God, 117)  ह्या त्यांच्या पुस्तकात आधुनिक अस्तित्ववाद हा देवाच्या अनुपस्थितीची कशा रीतीने पुष्टी करतो, ह्याचे वर्णन करतात : “ते म्हणतात कीं देव अनुपस्थित असलाच पाहिजे. अशाप्रकारे तो आपली मूलभूत इच्छा जाहीर करतो कीं देव अनुपस्थित असावा. ह्या मागील कारण स्पष्ट आहे…जर देव उपस्थित असेल, तर मनुष्य देवाद्वारे घडविला जात आहे, आणि त्याला माणूस बनवले जात आहे…[एका अशा नियतीसाठी] जी त्याने स्वतः निवडलेली नाही”.

आधुनिक अस्तित्ववादी देवाच्या अनुपस्थितीची पुष्टी करतो, ते ह्यामुळे नाही कीं त्याने देवाचा शोध घेतला पण त्याला यश आले नाही, तर ते ह्यामुळे कीं जर देव आहे, तर मनुष्य त्याच्या समक्ष उत्तरदायी आहे.  “आणि म्हणूनच तो देवाला मृत, बेपत्ता, अनुपस्थित असे घोषित करतो. ही घोषणा तो जाणीवपूर्वक करतो— देव नसावा हाच मागील एकमेव उद्देश्य” (द प्रॉब्लेम ऑफ गॉड, 117 / The Problem of God, 117). येथे आपण पाहतो कीं, मनुष्याचे प्राथमिक भय हे नाही कीं त्याला देव सापडला नाही, तर मनुष्याने स्वतःच देव नसावा अशी इच्छा जाहीर केली आहे, जेणेकरून त्याला दैवी निर्बंधांशिवाय जीवन स्वस्थपणे जगता येईल.

टाकिलेलें व एकाकी  

देवाच्या जिवंत-अनुपस्थितीच्या भावनेंत बुडून जाण्याचा आणखी एक प्रकार असा आहे, जो वैयक्तिक पापाशी संबंधित नसून, तिचा संबंध आपल्याला वाईट परिस्थितीत टाकून दिल्याची भावना आहे. पुन्हा ही अनुपस्थितीची अनुभूती विश्वासणार आणि गैर-विश्वासणार अशा दोघांसाठी एकसारखीच असू शकते.जेव्हां अचानक संकटांचा उद्रेक होतो, तेव्हां आपल्याला देव अदृश्य झाल्याची तीव्र जाणीव होऊ शकते आणि त्याच्या वरकरणी अनुपस्थितीमुळे आपण विव्हळ होऊन बसतो.

सी.एस. लुईस यांनीं, ‘अ ग्रीफ अबझर्व्ह, 6 / A Grief Observed,6 मध्ये ह्या भावनांचे अत्यंत मर्मस्पर्शी वर्णन केलें आहे. तसेच, एलियाने ईजबेलपासून पळ काढून वाळवंटातील गुहेत लपल्यावर, कदाचित काय अनुभवले असेल ह्याचे चित्रण (1 राजे 19) येथे आपल्याला पाहायला मिळते. जोसेफ मिनिच ह्यांनी ह्या परिस्थितीचे स्वरूप यथार्थपणे रेखाटले आहे :

“आपण प्रार्थना करतो तेव्हां तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, कीं तो आपल्याला अनेकदा दूर असल्यासारखा वाटतो, कीं बरेचदा आपली प्रार्थना जणू छतावर आदळून परत आल्यासारखी जाणवते. विशेषत: जे लोक दुःखाच्या परिस्थितीतून जात आहेत, ते त्याने एकदा तरी आपल्यासमोर “प्रकट व्हावें” अशी त्याजकडे विनवणी करतात आणि तरीही तो प्रकट होत नाही — हे सर्व प्रसंग आपल्याला असे ग्राह्य धरण्यास विवश करतांत किंवा कमीतकमी तशा परीक्षेत तरी पाडतात कीं, देव अस्तित्वातच नाही हा कदाचित एक अत्यंत “स्वाभाविक निष्कर्ष” असावा.”

(इण्डुअरिंग डिव्हाईन अॅबसेन्स/Enduring Divine Absence, 3)

अदृश्य, परंतु अनुपस्थित नाही 

एक नास्तिक उपहास करित जेव्हां असे म्हणतो कीं, देव त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न फक्त “प्रकट होऊन” अगदी सोप्या पद्धतीने मिटवू शकतो, तेव्हां त्याच्या ह्या कथांनात आपण दैवी अदृश्यता ह्याविषयीचा, म्हणजें देव नाही ह्या दृष्टिकोनाचा दूसरा प्रकार पाहतो. जशी एलियानें बालच्या संदेष्ट्यांची खिल्ली उडविली, अगदी तसेच नास्तिकदेखील विश्वासणाऱ्याची खिल्ली उडवत म्हणतो, “मोठ्याने ओरडा, कारण तो देव आहे. कदाचित तो चिंतन, आराम, प्रवासात, किंवा झोपलेला असावा आणि त्याला जागे करावे लागेल.” (1 राजे 18:27). मग देव नेमका आहे तरी कुठे?

अशा प्रकारच्या अनेक शंका-कुशंका आणि उपहासाला सामोरे जाताना अनेक विश्वासणारे देवाच्या अस्तित्वावर प्रश्न करू लागतात, तर काहीजण त्याच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा न मिळाल्यामुळे निराश होऊन चर्चेतून माघार घेतात. खासकरून जेव्हां आपण भूतकाळात देवाने-चमत्कारांद्वारे त्याचे अस्तित्व ठळकपणे प्रकट केलें असल्याचे ऐकतो, परंतु आता आपण त्या कार्यक्रमाला उशीरा पोहोचल्यासारखे वाटते, तेव्हां ह्या शंकांचे मूळ अधिक खोलवर रुजली जातात.

“आपणही देवाच्या उपस्थितीकडे सहज दुर्लक्ष करतो कारण ते अगदी स्वाभाविक आहे.”

तर परिणामी, देव बेपत्ता झाला आहे, ह्या वैयक्तिक जाणिवेला आपण कसे समजून घ्यावे? फर्नांड व्हॅन स्टीनबर्गन हे स्पष्ट करतात कीं, आपण प्रथम हे ओळखले पाहिजे कीं देवाचे जर खरोखर अस्तित्व आहे (आणि विशेषतःख्रिस्ती धर्माच्या देवाचे), तर तो “ऐहिकरित्या दृश्यमान” असावा अशी अपेक्षा आपण करूं नये (डियू कॅश, 348/Dieu Caché, 348). उलट व्हॅन स्टीनबर्गन पुढे असे म्हणतात, “जिवंत देव अपरिहार्यपणे एक अदृश्य देव आहे. तो, स्वभावतःच अगम्य, अदृश्य, आणि आपल्या समजबुद्धीच्या पलीकडे आहे, कारण तो आत्मा आहे (जो सर्व इंद्रिय अनुभवांच्या पलीकडे आहे) आणि तो अनंत आहे, म्हणजेच आपल्या मर्यादित अस्तित्वाच्या पलीकडचा आहे” (डियू कॅश, 348, ऑर्थर्स  ट्रान्सलेशन /Dieu Caché, 348, author’s translation).

अगदी स्पष्ट भाषेंत सांगायचे तर, ख्रिस्ती धर्माचा देव हा स्वभावाने इंद्रिय संवेदनांच्या पलीकडचा आहे, आणि तो मानवी बुद्धीच्या मर्यादित आकलन शक्तीपलीकडे आहे. म्हणजें, देवाचे अस्तित्व हे निर्विवाद असले तरी जोपर्यंत तो स्वतःला आम्हांवर प्रभावीरीत्या प्रकट करित नाहीं तोपर्यंत तो आपल्या सर्व आकलन शक्तीपलीकडचे देखील आहे.

सदैव आणि पूर्वीपासून अस्तित्वांत 

फर्नांड व्हॅन स्टीनबर्गन पुढे म्हणतांत, देव हा त्याच्या सृष्टीच्या ईश्वर-कृत निर्वाहन संचालानांत देखील लपलेला आहे, कारण त्याचे मार्ग आपल्यासारख्या मर्यादित बुद्धी असलेल्या मानवासाठी एक गूढ रहस्य आहेत (डियू कॅश, 348/Dieu Caché, 348). खरे तर, असे म्हणता येईल कीं देव त्यांने निर्मिलेल्या सृष्टीत “हस्तक्षेप” करत नाही, कारण तो आधीपासूनच तिचा उत्पन्नकर्ता व तिला टिकवून ठेवणारा तिचा संचालन-सूत्रधार म्हणून तिच्यांत  उपस्थित आहे (द रीयालिटी ऑफ द गॉड अँड द प्रॉब्लेम ऑफ ईव्हल,74-77 / The Reality of God and the Problem of Evil,74–77). देवाची उपस्थिती इतकीं स्पष्ट आहे कीं, आपण अगदी सहजपणे तिच्याकडे दुर्लक्ष करतो.

जर देव सदैव आणि पूर्वीपासूनचउपस्थित आहे, तर तो “हस्तक्षेप” करत नाही (तो बाहेरून कृती करतो) जसे कधी-कधी मत्स्यालयाचा मालक अधून मधून कचरा साफ करण्यासाठी स्वत: कामास हात घालतो, तसेच ख्रिस्ती धर्म प्रत्येक नैसर्गिक घटनेतून त्याचे प्रात्यक्षिक देतो—जसे कीं शरद ऋतूमध्ये झाडांची पाने गळणे, हिवाळ्यात बर्फ पडणे, वसंत ऋतूमध्ये फुले उमलणे किंवा उन्हाळ्याच्या तापमानात गवत तपकिरी होणे — ह्या सर्वांच्या संचालनामध्ये देव सदैव उपस्थित आणि सक्रिय असतो.

आपण देवाला “पाहू” शकत नाही, कारण त्याचा दैवी स्वभावच अदृश्य स्वरूपात आहे. मात्र, निर्मितींत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याची हस्तकृती पाहतो. जॉन कॅल्विन यांनी आपल्या इन्स्टिट्यूट्स ऑफ ख्रिश्चन रिलीजन मध्ये म्हटल्याप्रमाणे, “मला फक्त ही वस्तुस्थिती स्पष्ट करायची आहे कीं, देवाचा शोध घेण्याची हा मार्ग विधर्मी असोंत वा त्याच्या स्वतःच्या घरचे, या दोन्हीं क्षेत्रातील लोकांसाठी सारखांच आहे, म्हणजें जर त्यांनी सृष्टीतला आराखडा समजून घेतला तर देवाचे जिवंत प्रतिरूप त्यांच्यासमोर उभे राहील” (1.5.6). जॉन कॅल्विनच्या मते, देवाचे गुण सृष्टीची निर्मिती व तिच्या प्रत्येक संचालनांत इतके स्पष्टपणे प्रकट आहेत कीं मनुष्याला जर आपल्या इंद्रिय-संस्थेसमोर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याचे कार्य प्रकटपणे दिसून येत नाहींत, तर त्याला त्याचे डोळे उघडणेही कठीण होईल.

शेवटी, देवाची उपस्थिती ओळखणे हा असामान्य बुद्धीबळ किंवा ज्ञानाचा प्रश्न नसून, तो आपण त्याचे अस्तित्व मानतो अथवा नाकारतो या कुवतीचा प्रश्न आहे. देवाच्या अस्तित्वावर केलेंल्या व्यंगात्मक प्रश्नाचे उत्तर मोकळेपणाने आणि इच्छाशक्तीने ह्या जगातील असंख्य चमत्कारांचा विचार करून दिले जाऊ शकते, कारण त्यांच्यावर विचार केल्यास हे स्पष्ट होते कीं, देव आहे आणि तो नेहमी सर्वत्र उपस्थित आहे.

शांततेत शोधा 

देवाच्या अदृश्यतेची कारणे तपासून पाहिल्यानंतर, आपण देवाच्या जिवंत अनुपस्थितीला कश्याप्रकारे समजू शकतो?  जसे आपण आधी पाहिले आहे कीं, देव नेहमीच उपस्थित आहे, तर मग मीं “मृत्युच्छायेच्या दरीतून जात असलो”(स्तोत्र 23:4) तेव्हां मला त्याची उपस्थिती इतकीं दूर का जाणवते?  संकटसमयी देवाने साहाय्य करण्यास सदा सिद्ध नसावे काय? (स्तोत्र 46:1). होय, तो आहे! सुदैवाने, देवाच्या उपस्थितीची अनुभूती माझ्या इंद्रियांना जाणवते किंवा नाही, ह्यावर त्याची उपस्थिती अवलंबून नाही. मला त्याच्या उपस्थितीची जाणीव असो वा नसो, देव सदैव सर्वत्र उपस्थित असतो.

देवाच्या जिवंत-अनुपस्थितीचे समाधान काढण्याचे अनेक मार्ग आहेत आणि वरील उतार्‍यात आपण त्याच्यावर चर्चा केली आहे, त्यापैकीं एक: आपल्या पापांपासून पश्चात्ताप करणे आणि पापांची कबुली देणे. पण जर ईयोबाप्रमाणे, मीही पश्चात्ताप केला आणि माझ्या चुका कबूल केल्या, तरीही देव स्वत:ला माझ्यापासून लपवत असेल, तर मग मी काय करावे? एका संगीतकाराने आपल्या ह्या भावनांना शब्दांत मांडले, ते असे : 

माझ्या भावनांच्या वेढ्यांनी मला विळखा घातला आहे,
आणि आता त्या पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ झाल्या आहेत.
जेव्हां अंधार उजेडाशी लढतो,
तेव्हां मी तुझ्याकडेच धाव घेईन;
मी निरंतर तुझ्या नावाचा धावा करीन .
काहीही घडो, मी कितीही दूर जाऊ दे,
तरीही मी तुझाच शोध घेईन, हे वचन देतो तुला! (स्पोकेन, “नथिंग विथआऊट यू”/ Spoken, “Nothing Without You”)

जे त्याला हाक मारतात, त्यांना ख्रिस्ताचे अभिवचन हे आहे, “कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडतो व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाईल.”(मत्तय 7:8). म्हणून, जेव्हां आपल्याला देवाच्या अनुपस्थितीची भावना पिळून काढते, तेव्हां नैराश्यात बुडण्याऐवजी आपण देवाला हाक मारतो, प्रार्थनेत त्याची प्रतीक्षा पाहतो, उपासनेत त्याच्याकडे दृष्टि लावतो, आधारासाठी त्याच्या भवनाकडे — ख्रिस्ताच्या शरीराकडे — धाव घेतो, आपण त्याच्या वचनात त्याला शोधतो, आणि प्रभूभोजनाद्वारे त्याच्या उपस्थितीची आठवण करतो.

कधी-कधी, किबहुंना बरेचदा, देव आपल्याला त्याची अनुपस्थिती जाणवू देतो, तो आपल्याला त्याच्या अनुपस्थितीची शांतता अनुभवू देतो, आपले उत्तर नाकारण्यासाठी नव्हे, तर पुनरुत्थित ख्रिस्ताची करुणाशील दृष्टी, आपण त्याच्यावर विसंबून राहावे आणि आपल्याला त्याची गरज आहे, हे आपल्या लक्षात आणून देण्यासाठी आपली वाट पाहत असते.

This image has an empty alt attribute; its file name is david-haines-m0akfya0-3e216e3f313e126267b0bc3574ab1c5b.jpg


Article by David Haines
Professor, Bethlehem College and Seminary


अधिक वाचनासाठी पुस्तके :

जीवित परमेश्वर को जानना
पॉल डेव्हिड वॉशर

1 Comment

  1. Dipak G Bhosale January 3, 2025at4:34 pm

    I heard first time.

    Reply

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *