Glorify God, delight in Him—Christ-centered truths.
लेख - जें आपल्यां जीवनाच्या सर्व क्षेत्रात समाधानी राहून देवाचे गौरव करण्याची उत्कंठा बाळगतांत त्यांनी डिझायरिंग गॉड मधील विविध लेखकांचे लेख वाचावे. ह्या लेखकांनी अशा नानाविध विषयांवर लेख लिहिले आहेत ज्यांचा ठसा प्रथम त्यांच्या अंतःकरणांत उमटला. हे लेख देवाच्या वचनाला अनुसरून आहेत, आणि त्यातील युक्तिवाद आग्रही आणि ख्रिस्ताच्या सुगंधाने सुवासिक झालेले आहेत.
जेव्हां ख्रिस्ती विश्वासणारे त्याच्या अनुपस्थितीची जाणीव करतांत परंतु जेव्हां तुम्हाला त्याची अत्यंत निकडीची गरज भासते आणि इतर सर्व आधार निष्फळ ठरतात, तेव्हां तुम्हीं त्याच्याकडे वळता, पण तुमच्या निदर्शनास काय येते? तुमच्या तोंडावर दार जोरात बंद केल्याचे निदर्शनास येते आणि आतून ते दार अधिक घट्ट बंद करण्याचा आवाजही कानी पडतो. त्यानंतर तेथे भयाण शांतता पसरते. तसेच तुम्हाला असे वाटू शकते कीं, येथे थांबण्यात काहीही अर्थ…
“तुम्हांला जीवनांत एकच संधी मिळते, बस एवढेच. फक्त एकच. आणि त्या जीवनाचा चिरकाळ टिकणारा मापदंड म्हणजे येशू ख्रिस्त.”
"तुमचे मन यासाठीच बनवले गेलें होते कीं तुम्हीं देवाला ओळखावे आणि त्याजवर प्रीति करावी."
“तुमच्या जीवनातून काहीं तरी पराक्रमी अशी गोष्ट घडून यावीं अशी अपेक्षा करा! तुमच्या आयुष्याला चिरकाळ टिकणारा अर्थ प्राप्त व्हावा अशी उत्कंठा बाळगा. त्यासाठी तहानलेले असां! जीवनाचा प्रवास आवेशविरहित पूर्ण करूं नकां."
"जेव्हां आपण देवामध्यें सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतो तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरवविला जातो."
“देवाचा देवाकरिता असणारा आवेश आमच्यासाठी असणार्या देवाच्या करुणेचा पाया आहे.”
"भारतातील मंडळीला सत्यात आणि विश्वावासात वाढण्यास सुसज्ज करण्यासाठी पवित्र शास्त्र केंद्रित साहित्याचा अभ्यास करा."