“We avoid getting a hard heart by being in a healthy community of believers who exhort us every day.”
February 1, 2024
पास्टर जॉन यांना विचारा या मराठी पोडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वाचे स्वागत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आत्म-संशयाच्या संघर्षात असलेल्या श्रोत्यांकडून येणारे बरेच प्रश्न आम्ही हाताळले आहेत- याबद्दल की ते खरंच विश्वासात आहेत कि नाही असा प्रश्न; त्यांनी अक्षम्य पाप केले आहे का हे विचारणे; ते विश्वासात आहेत कि मागे गेले आहेत, ते देवाने निवडलेल्यांपैकी एक आहेत का हे विचारणे. यासारखे बरेच विचारशील, भयभीत, आत्मचिंतन करणारे प्रश्न आम्हाला ईमेलमध्ये नेहमीच येतात. आज अहरोनच्या प्रश्नात हे खरे आहे.
“सलाम, पास्टर जॉन! मी प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी खरोखरच आशीर्वादित आहात. मी तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो. माझे अलीकडेच प्रभूसोबत अधिक चांगले नाते जोडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन करारात मला ‘कठोर अंतःकरणाविषयी’ चा वाक्प्रचार अनेकदा आढळतो. माझा प्रश्न असा आहे: देवाविरुद्ध माझे मन कठोर झाले आहे हे मला कसे कळेल? याचा अर्थ काय? आणि देवाप्रती माझे मन कठोर होणार नाही याची मी खात्री कशी करू शकतो?”
पास्टर जॉन
प्रथम आपण पवित्र शास्त्रातील “हृदयाची कठोरता” या संकल्पनेचा सामान्य अर्थ समजून घेऊया. त्यानंतर आपण देवाशी संबंधित ख्रिस्ती दृष्टिकोनातून “हृदयाची कठोरता” काय आहे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करूया
भावनाशुन्य हृदय
कठोर हृदयाचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय ज्यामध्ये कोमलता आणि करुणेचा अभाव असणे – उदाहरणार्थ, गरीबांबद्दल दया. (अनुवाद 15:7-8) “जर . . . तुमचा एक भाऊ गरीब झाला असेल तर . . तुम्ही तुमचे हृदय कठोर करू नका. . . पण तुमच्या गरीब भावासाठी, तुमचा हात आखडू नका ”
“आम्हाला दररोज प्रोत्साहन देणाऱ्या विश्वासणार्यांच्या निरोगी समुदायात राहून आपण कठोर हृदय मिळवणे टाळतो”.
केवळ गरीबांबद्दलच सहानुभूती असणे असे नाही, तर आजारी किंवा अपंगांसाठी देखील दया असणे. मार्क 3 मध्ये, येशू सभास्थानात हात वाळलेल्या एका माणसाला पाहतो आणि त्याला बरे करतो. मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले (मार्क 3:4). इथे ह्या प्रश्नाचे उत्तर देणे काही कठीण नव्हते, बरोबर? जीव वाचवायचा की मारायचा? पण ते गप्प बसले. आणि वचन असे सांगते कि “मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले” (मार्क 3:5).
म्हणून, “हृदयाची कठोरता” ह्याचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय आहे ज्याला इतरांच्या दुःखा प्रती भावना, सहानुभूती, कळवळा वाटत नाही. हे हृदय ज्याला काहीहि वाटत नाही, जाणवू शकत नाही ते दगडासारखे आहे. तर, जोनाथन एडवर्ड्स, यांच्या ‘रिलिजियस अफेक्शन्स’ या पुस्तकात जे लिहिले आहे ते तुम्हीं वाचावे अशी मी शिफारस करतो; माझ्या आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ते माझ्यासाठी सामर्थ्यवान होते — अनेक शास्त्रभागांचे अध्ययन केल्यावर, हृदयाच्या कठोरपणाची व्याख्या ते अशी करतात, “कठोर हृदय म्हणजे अप्रभावित हृदय किंवा सद्गुणांच्या भावनांनी सहजासहजी प्रभावित होऊ न शकणारे किंवा दगडासारखे, संवेदनाहीन, मूर्ख, गतिहीन आणि अप्रभावित असे हृदय, ही एडवर्ड्सची व्याख्या आहे.
पश्चात्ताप न करणारे हृदय
“पवित्र शास्त्रामध्ये हीच वास्तविकता आपल्याला दिसते, ज्यामध्ये सुरुवातीला गरीब आणि अपंग लोकांबद्दल सहानुभूती नसणे यापासून ते पुढे जाऊन देवाच्या आवाजाला प्रतिसाद न देणे या स्तरावर पोहोचते.
कठोर हृदय देवाचे ऐकण्यास, पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यास नकार देते. सिदकिया बद्दल पवित्र शास्त्र सांगते की, “त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.” (2 इतिहास 36:13). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्याला पश्चात्ताप करण्याची आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा वाटली नाही. त्याच्या जीवनात सत्य बोलण्यासाठी संदेष्ट्यानी केलेल्या सर्व प्रयत्नांना तो दगडासारखा अविचारी, प्रतिसाद न देणारा झाला.
रोमकरांस पत्र 2:4-5 मध्ये आपण ते अधिक सामान्यपणे पाहतो: “देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस?” पॉल म्हणतो, देवाचा दयाळूपणा, संयम, सहनशीलता, ह्यामुळे आपले हृदय कृतज्ञता, नम्रता व पश्चात्तापाने वितळले पाहिजे त्याऐवजी ते पाषाणासारखे कठीण निरुत्तर, निश्चल, कृतघ्न, गर्विष्ठ, उद्धट असे हृदय बनले आहे. जेव्हा जखऱ्या संदेष्ट्याद्वारे प्रभूचे वचन लोकांपर्यंत पोहोचले, तेव्हा ते असे म्हणाले,” सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले”; (जखऱ्या ७:१२).
म्हणून, पवित्रशास्त्रामधील हृदयाची कठोरता हे पाषाणासारखे हृदय असणे असे आहे कारण ते कधीकधी मानवी दुःखांना न समजणारे, अचल, भावनाशून्य, प्रतिसादहीन असते, , परंतु, सर्वात वाईट म्हणजे देवाच्या वचनाबद्दल, देवाच्या दयेबद्दल आणि देवाच्या सुवार्तेबद्दल निरुत्साही, अचल, भावना नसलेले असे आहे. देवाच्या दयेचा उबदारपणा त्यावर चमकतो तरी ते वितळत नाही. देवाची कृपा त्यावर ओतली जाते तरी, ते मऊ होत नाही. हिऱ्यासारखे कठोर हृदय असल्याने तो देवाचा प्रतिकार करतो.
पाषाणाला मांसमय बनवले.
तर, आपण विचारतो, कठोर हृदयापासून कसे मुक्त होऊ शकतो किंवा ते होऊ न देण्यासाठी काय करावे? कठोर हृदयापासून मुक्त होणे हे निर्णायक आहे, पवित्रशास्त्र म्हणते, ते देवाचे कार्य – एक चमत्कार, एक देणगी आहे – आणि आपल्याकडे नसल्यास ते आपण मागावे.
यहेज्केल 36:26-27 — हे नवीन कराराचे एक सुंदर विधान आहे जे येशूने पाप्यांसाठी आपले रक्त सांडल्यानंतरच त्याचे पूर्णत्व साध्य झाले.
मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. म्हणजे, असे कोमल हृदय जे भावनांचा अनुभव घेऊ शकते आणि ज्याला भावनांची जाणीव होऊ शकते. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.. आणि मी माझा आत्मा तुमच्या ठायी घालीन, तुम्हाला माझ्या नियमांनुसार चालायला लावीन आणि तुम्ही माझे नियम पाळण्याची काळजी घ्या.
मला वाटते कि, हे तेच आहे, ज्याला आपण नवीन जन्म होणे किंवा जिवंत होणे किंवा अंधारातून प्रकाशाकडे बोलावणे म्हणतो. ही एक देवाची देणगी आहे, हा एक चमत्कार आहे, हे देवाचे कार्य आहे आणि आपण ते भेट म्हणून स्वीकारले पाहिजे.
कोमल हृदय ठेवणे
दुसरे म्हणजे, एकदा आपल्याला सौम्य हृदय देण्यात आल्यानंतर, आपल्याला दररोज उपदेश देणाऱ्या आणि पापाचे फसवे स्वरूप ओळखण्यास मदत करणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या निरोगी समुदायात राहून आपण कठोर हृदय होणे किंवा कठोर हृदयाकडे परत जाणे टाळतो. आता, मी असे म्हणतो कारण इब्री 3:13 मला तेच तुम्हाला सांगायला सांगते. ते म्हणते, “जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये”. हे आश्चर्यकारक आहे. अशा चांगल्या समुहात सामील व्हा जिथे तुम्हाला दररोज पापाच्या धोकादायक स्वरूपाविषयी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले जाईल.
पाप हे फसवे असते. ते खोट बोलते आणि ते खोट हृदयाला कठोर करते. जर आपण सत्याने खोट्या पापाचा प्रतिकार केला नाही तर आपली अंतःकरणे कठोर होतील. आणि देवाने सहख्रिस्ती लोकांना सौंदर्य, मौल्यवानता, मूल्य, देवाचे समाधानकारक स्वरूप आणि त्याचे मार्ग आणि पापाचा खोटेपणा या सत्याची आठवण करून देण्यासाठी तयार केले आहे. लोकांनी आपल्या जीवनात ह्या गोष्टी बोलने गरजेचे आहे.
पाप आपल्याला सांगते की देव आणि त्याचे मार्ग समाधानकारक नाहीत. पापाचा हाच मुख्य संदेश आहे. मी पुन्हा सांगतो: पापाचे मुख्य खोटेपणा म्हणजे देव आणि त्याचे मार्ग समाधानकारक नाहीत. आणि जर आपण त्या खोट्या गोष्टींना स्थान दिले तर आपण ते स्वीकारतो; ते आपल्या हृदयात वाढू लागतात मग आपण सर्व-समर्थ देवासाठी दगड बनतो. देवाऐवजी, पाप आपले समाधान बनते. मग आपल्यालाला पाप आवडू लागते. पाप आपल्याला अश्या प्रकारे फसवते कि आपण त्यात समाधानी आहोत असे वाटते आणि देव कंटाळवाणा आणि असमाधानकारक वाटू लागतो. देवाचा आपल्याला कंटाळू येवू लागतो, आणि जर कोणतेही पाऊल उचलले नाही व आपल्या पापाचा भ्रामक मूर्खपणा जाणवला नाही, तर आपण एखाद्या दिवशी पूर्णपणे दगडासारखे होऊ, आणि देवाचा आनंद आपण घेऊ शकणार नाही.
म्हणून, इब्री 3:13 म्हणते, “ते होऊ देऊ नका.” त्याऐवजी, तुम्ही बोलावलेले आहात व तुमची निवड केलेली आहे ह्याची पुष्टी करा. तुम्ही कसे खरे ख्रिस्ती आहात हे दाखवा? “तुम्हापैकी कोणीही पापाच्या फसवणुकीने कठोर होऊ नये म्हणून प्रतिदिवशी एकमेकांना देवाच्या वचनातून बोध घ्या व बोध करत रहा.”